लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डी.एन.ई.136) पुणे जिल्हाध्यक्षपदी ग्रामपंचायत अधिकारी अमोल महादेव घोळवे यांची विक्रमी मतांनी फेरनिवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारणी 2026 ते 2031 या पंचवार्षिक कार्यकाळासाठी नुकतीच सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये झालेल्या निवडणुकीत अमोल घोळवे यांची विक्रमी मताने फेरनिवड करण्यात आली आहे.

सदर निवडणुक प्रक्रिया पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियनचे कार्यालय शिवलिला चेंबर, सदाशिव पेठ, कुमठेकर रोड, पुणे या ठिकाणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी पी. एस. पवार, राज्य निवडणूक निरीक्षक आर. डी. पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष प्रवीण देसाई, सुप्रिया सांडभोर, नानासाहेब काळाणे, अनिल बगाटे यांच्या उपस्थितीत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

निवडणूक प्रक्रियावेळी राज्य घटना दुरुस्ती अध्यक्ष अनिल कुंभार,पतसंस्था चेअरमन बाळासाहेब मतकर, महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघ संघटक व कदमवाकवस्तीचे ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत वाव्हळ तसेच सर्व तालुका अध्यक्ष सचिव व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. पदाधिकारी निवड झाल्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन नवीन निवड झालेल्या कार्य कारणीचा सर्व उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी यांचे वतीने सत्कार करण्यात आला. पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर उपस्थितांचे आभार मानले.

निवडीनंतर बोलताना अध्यक्ष अमोल घोळवे म्हणाले, “ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या प्रमुख प्रलंबित मागण्या पैकी पंचायत विकास अधिकारी, 10, 20, 30 अश्वासित योजना, सेवा विषयक बाबी, जुनी पेन्शन योजना, ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कडील अतिरिक्त कामे, आदर्श ग्रामसेवक वेतन वाढी, प्रलंबित मेडीकल बिले, वेतन त्रुटी इत्यादी कामे सोडविण्यासाठी प्रामुख्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. सभासदाचे आस्थापना विषयक प्रश्न सोडवण्यात येतील, तसेच तालुका स्तरावर संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
2026 ते 2031 पंचवार्षिक कार्यकारणी पुढीलप्रमाणे :-
अध्यक्ष – अमोल महादेव घोळवे, मानद अध्यक्ष – संतोष अर्जुन भोसले, सचिव – संदीप नारायण ठवाळ, सहसचिव – तुषार प्रकाश काशीद, उपाध्यक्ष – निलेश केरू पांडे, महिला उपाध्यक्ष – अस्मिता लक्ष्मण चव्हाण, कोषाध्यक्ष – राजाराम दत्तात्रय रासकर, कार्याध्यक्ष – पुंडलिक गेणबा म्हस्के, प्रसिद्धी प्रमुख – आशिष प्रकाश कोल्हे, महिला संघटक – मीरा विठ्ठल होले, नीलिमा प्रकाश जाधव, संघटक – नवनाथ जनार्दन झोळ, कायदेशीर सल्लागार – लक्ष्मीकांत केरबा जगताप, लेखा परीक्षक – हनुमंत धुंडाजी तारडे







