Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘लिलावात संगनमत’ : शिरूरच्या तहसीलदारांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; संपूर्ण चौकशीचे आदेश…..

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 19 July 2026, 13:15

शिरूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील एका मालमत्ता लिलाव प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महसूल प्रशासनाच्या कारभारावर कठोर ताशेरे ओढत 29 एप्रिल 2026 रोजी झालेला लिलाव रद्द केला आहे.न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नमूद केले की,महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील(MLRC)अनिवार्य 30 दिवसांच्या नोटिशीच्या तरतुदीचे उल्लंघन करून केवळ दोन दिवसांच्या नोटिशीवर लिलाव घेण्यात आला.ही केवळ प्रक्रियेतील त्रुटी नसून गंभीर बेकायदेशीरता आहे.असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शिरूरच्या तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत,तहसीलदारांनी न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले.तसेच या दरम्यान लिलावातील बोलीदारांची आर्थिक पात्रता तपासण्यात आली नव्हती,त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाली नव्हती आणि SBI ची स्पष्ट ना हरकत नसतानाही लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे न्यायालयाने नोंदविले आहे.

न्यायालयाने पुढे असेही निरीक्षण नोंदविले की,उपलब्ध कागदपत्रे आणि घटनाक्रमावरून लिलाव विशिष्ट खरेदीदाराच्या फायद्यासाठी संगनमताने(Collusion) राबविण्यात आल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष निघतो.या पार्श्वभूमीवर शिरूरच्या संबंधित तहसीलदाराविरुद्ध तातडीने चौकशी करून आवश्यक असल्यास निलंबनाचा विचार करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाकडून राज्य शासनाला देण्यात आले आहेत.

या प्रकरणात पुण्याचे जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रवासादरम्यान उपस्थित राहिल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.तसेच संबंधित मालमत्तेवर प्रथम हक्क असूनही अनेक वर्षे प्रभावी कारवाई न केल्याबद्दल भारतीय स्टेट बँकेच्या (SBI)भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत अंतर्गत चौकशी करण्याची अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे.

 

या निर्णयातून महसूल प्रशासनाने कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन केलेल्या मनमानी कारवाईला न्यायालय कोणतीही मुभा देणार नाही,असा स्पष्ट आणि कडक संदेश राज्यातील प्रशासनाला मिळाल्याची चर्चा कायदेवर्तुळात सुरू आहे.त्यामुळे शिरूरच्या तहसीलदारांवर काय कारवाई होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

२०२७ वनडे वर्ल्ड कपच्या थराराला २ ऑक्टोबरपासून होणार सुरूवात! पुन्हा होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; ICC कडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Thursday, 1 October 2026, 23:01

मुंबईत प्रवास करणे झाले महाग! मुंबईच्या ५ प्रवेशद्वारांवर टोलचे दर वाढले; आजपासून नवे दर लागू

Thursday, 1 October 2026, 22:37

दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर! निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्यभरात शोककळा

Thursday, 1 October 2026, 22:23

उन्नत महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी राहुल शेवाळेंचा पुढाकार! हडपसर ते उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; योग्य बाजारभावाची मागणी

Thursday, 1 October 2026, 21:56

ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान; राज्य शासनाच्या आदेशामुळे पुणे-पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली

Thursday, 1 October 2026, 21:16

उरुळी कांचन येथील डॉक्टर महिलेच्या घरातून ११ लाखांचे दागिने चोरी! पोलिसांचा तपास अपयशी; पोलिसांकडून ‘अ’ वर्ग फायनल समरीची प्रक्रिया

Thursday, 1 October 2026, 20:24
Next Post

पुणे-शिरूर उन्नत महामार्गाला 'स्वर्गीय अजितदादा पवार' यांचे नाव द्या; आमदार माऊली कटके यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp