सुरेश घाडगे
परंडा : Paranda News – तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनारी येथील श्रीकाळभैरवनाथ यात्रा उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला रथोत्सव मंगळवार दि . १८ रोजी दुपारी २ : १५ वाजता मंदिरातून प्रारंभ झाला. (Paranda News) यावेळी लाखोचा जनसागर उसळला होता. भैरवनाथाचं चांगभलंच्या जयघोषात रथोत्सव उत्साहात झाली. लाखो भाविकांनी रथ ओढला व दर्शन घेतले. (Paranda News)
पालकमंत्री डॉ . सावंत यांच्या हस्ते महाआरती
सार्वजनिक आरोग्य तथा कुटूंब कल्याण मंत्री पालकमंत्री प्रा . डॉ . तानाजी सावंत यांच्या हस्ते विधीवत पुजा महाआरती करुन रथ ओढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी , परंडा तहसिलदार रेणुकादास देवणीकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत , माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर , जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता साळुंखे, माजी सभापती नवनाथ जगताप , माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल , माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर , बाळासाहेब पडघण ,भैरवनाथ शिंदे , राहूल डोके , जयदेव गोफणे, विशाल देवकर आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती .
श्रीक्षेत्र सोनारी येथे चैत्र वद्य एकादशी रविवार (दि.१६) प्रत्यक्ष यात्रेस सुरवात झाली होती. जवळपास ८ लाख भाविक भक्तांनी श्रीकाळभैरवनाथचे दर्शन घेतले . वद्य द्वादशी सोमवार (दि.१७) भैरवनाथास रुद्राभिषेक घालण्यात आला व महानैवद्य दाखविण्यात आला. चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवार (दि.१८) कंडारी येथुन आलेल्या कावडीने सोनुबाई कुंडातील तिर्थाने भैरवनाथास महाआभिषेक करून दुपारी १२ वाजता महानैवद्य देऊन दुपारी २.१५ वाजता श्री काळभैरवनाथाची उत्सव मुर्ती सजवलेल्या रथात ठेवून “भैरवनाथाच चांगभल” गजर करत गुलाल खोबरे उधळन करत मंदिरापासुन मुख्य रथोत्सवास सुरु झाला.
रथ दर्शन व रथ ओढण्यासाठी राज्यासह आंध्रप्रदेश , कर्नाटक ठिकाणाहून भाविक आले होते. भैरवनाथाच्या रथास भोंजा येथुन आलेल्या पारंपारिक मानाचा नाडा रथास बांधला. रथोत्सवा सोबत पुजारी संजय महाराज , समीर पुजारी धुपारती घेऊन होते . सोबत अब्दागिरीवाले, चौरीवाले व त्यांच्या मागे सांगोल्याची मानाची बहीण, कंडारी येथुन आलेली कावड, पालखी, घोडा आदीसह लाखो भाविक “भैरवनाथाच चांगभल” “देवांच्या माकडाच , देवाच्या घोड्याचं चांगभल” चा जयघोष करत गुलाल खोबरे उधळत रथ ओढत होते . जयघोषाने अवघी सोनारी नगरी दुमदुमली होती .
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Paranda News : परंडा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे रविवारी उद्घाटन…!
परंडा येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन…!