Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Paranda News : श्रीक्षेत्र सोनारी नगरी श्री काळ भैरवनाथ भक्तांनी गजबजली अन गुलालाने माखली, भैरवनाथाचं चांगभलंच्या जयघोषात रथोत्सव उत्साहात ; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 April 2023, 19:16

सुरेश घाडगे

परंडा : Paranda News – तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनारी येथील श्रीकाळभैरवनाथ यात्रा उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला रथोत्सव मंगळवार दि . १८ रोजी दुपारी २ : १५ वाजता मंदिरातून प्रारंभ झाला.  (Paranda News) यावेळी लाखोचा जनसागर उसळला होता. भैरवनाथाचं चांगभलंच्या जयघोषात रथोत्सव उत्साहात झाली. लाखो भाविकांनी रथ ओढला व दर्शन घेतले. (Paranda News)

पालकमंत्री डॉ . सावंत यांच्या हस्ते महाआरती

 

सार्वजनिक आरोग्य तथा कुटूंब कल्याण मंत्री पालकमंत्री प्रा . डॉ . तानाजी सावंत यांच्या हस्ते विधीवत पुजा महाआरती करुन रथ ओढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी , परंडा तहसिलदार रेणुकादास देवणीकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत , माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर , जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता साळुंखे, माजी सभापती नवनाथ जगताप , माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल , माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर , बाळासाहेब पडघण ,भैरवनाथ शिंदे , राहूल डोके , जयदेव गोफणे, विशाल देवकर आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती .

श्रीक्षेत्र सोनारी येथे चैत्र वद्य एकादशी रविवार (दि.१६) प्रत्यक्ष यात्रेस सुरवात झाली होती. जवळपास ८ लाख भाविक भक्तांनी श्रीकाळभैरवनाथचे दर्शन घेतले . वद्य द्वादशी सोमवार (दि.१७) भैरवनाथास रुद्राभिषेक घालण्यात आला व महानैवद्य दाखविण्यात आला. चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवार (दि.१८) कंडारी येथुन आलेल्या कावडीने सोनुबाई कुंडातील तिर्थाने भैरवनाथास महाआभिषेक करून दुपारी १२ वाजता महानैवद्य देऊन दुपारी २.१५ वाजता श्री काळभैरवनाथाची उत्सव मुर्ती सजवलेल्या रथात ठेवून “भैरवनाथाच चांगभल” गजर करत गुलाल खोबरे उधळन करत मंदिरापासुन मुख्य रथोत्सवास सुरु झाला.

रथ दर्शन व रथ ओढण्यासाठी राज्यासह आंध्रप्रदेश , कर्नाटक ठिकाणाहून भाविक आले होते. भैरवनाथाच्या रथास भोंजा येथुन आलेल्या पारंपारिक मानाचा नाडा रथास बांधला. रथोत्सवा सोबत पुजारी संजय महाराज , समीर पुजारी धुपारती घेऊन होते . सोबत अब्दागिरीवाले, चौरीवाले व त्यांच्या मागे सांगोल्याची मानाची बहीण, कंडारी येथुन आलेली कावड, पालखी, घोडा आदीसह लाखो भाविक “भैरवनाथाच चांगभल” “देवांच्या माकडाच , देवाच्या घोड्याचं चांगभल” चा जयघोष करत गुलाल खोबरे उधळत रथ ओढत होते . जयघोषाने अवघी सोनारी नगरी दुमदुमली होती .

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Paranda News : परंडा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे रविवारी उद्घाटन…!

Paranda News : सिना-कोळेगाव पाणीपुरवठा योजनेला नविन जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वीत ; परंडा शहराला आता मिळणार स्वच्छ पाणी…!

परंडा येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन…!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10
Next Post

Satara : वडूज नगरीमध्ये कचऱ्याबाबत घंटागाडी बंद, कचऱ्याला आसरा आजूबाजूचा परिसर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.