जळगाव : जळगावमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 12 वीच्या बोर्ड परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. ऋषिकेश दिनेशचंद्र पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

आज 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला. या निकालात अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाल्याने जळगाव जिल्ह्यातील ममूराबाद गावात ऋषिकेश दिनेशचंद्र पाटील याने राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.








