Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पावसाचा रौद्रावतार! 20 वर्षांचा विक्रम मोडला; पुढचे 2-3 दिवस आणखी धोकादायक

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 6 July 2026, 9:23

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्याला गेल्या 24 तासांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान विभागाने आज, 6 जुलै रोजी पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पुणे महापालिका प्रशासनाने आज शहरातील व जिल्ह्यातील सर्व शाळांना तातडीने सुट्टी जाहीर केली आहे.

गेल्या 20 वर्षांतील विक्रम मोडीत काढत पुण्यात रविवारी एकाच दिवसात 31.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा हा धुवांधार मारा पुढील 2 ते 3 दिवस असाच सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मुसळधार पावसामुळे पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले असून त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे.

या नैसर्गिक संकटकाळात एक दिलासादायक बातमी म्हणजे खडकवासला धरण साखळी परिसरात झालेला दमदार पाऊस. गेल्या 24 तासांत या धरणांमध्ये तब्बल 1 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे, जो शहरासाठी महिनाभर पुरू शकतो. सध्या धरणांमध्ये 5.72 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे, जो गेल्या वर्षीच्या 17.67 टीएमसीच्या तुलनेत अजूनही कमी असला, तरी सध्याच्या स्थितीत ही सकारात्मक बाब आहे.

 

गुंजवणी नदीला आलेल्या पुरात गावकऱ्यांनी श्रमदानातून बनवलेला कच्चा रस्ता वाहून गेल्याने सुमारे 25 गावांचा संपर्क तुटला आहे. यासोबतच वरंध घाटातील उबर्डे गावाजवळ दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अत्यंत निकडीचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. तसेच, नदी-नाले आणि दरड प्रवण क्षेत्रांपासून लांब राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक प्रशासन पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आषाढी वारीवर पावसाचे संकट! इंद्रायणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; आळंदीतील 4 पूल गेले पाण्याखाली

Monday, 6 July 2026, 14:06

घरात कामाला ठेवली…अन् तिने मारला लाखोंचा डल्ला! हिऱ्याच्या अंगठ्या केल्या लंपास; पुण्यातील घटना

Monday, 6 July 2026, 13:19

पुण्यात पावसाचा कहर! पवना लेकजवळ दरड कोसळली, 20 ते 30 जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

Monday, 6 July 2026, 12:35

‘तरडे येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आरोही बरकडे लिखित पुस्तकाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांच्या हस्ते प्रकाशन..

Monday, 6 July 2026, 12:20

दौंड शहरात ‘हिट अँड रन’चा प्रकार! अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी मजुराचा जागीच मृत्यू, चालक फरार..

Monday, 6 July 2026, 11:01

एका लुडोच्या गेमने घेतला तरुणाचा जीव! तरुणासोबत घडलं भयंकर; नेमकं काय घडलं वाचा

Monday, 6 July 2026, 10:01
Next Post

एका लुडोच्या गेमने घेतला तरुणाचा जीव! तरुणासोबत घडलं भयंकर; नेमकं काय घडलं वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.