बेंगरूळ: नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीने (Shocking News) केलेला सामूहिक (Viral News) बलात्काराचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे (Bengluru News) पोलिस तपासात उघड झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि विद्यार्थिनीच्या व्हॉट्सअॅप चॅट्समधून हा प्रकार विद्यार्थिनीच्या संमतीने घडल्याचे स्पष्ट झाले. मानेवरील ओरखडे आणि लव्ह बाईट्सबाबत प्रियकराला उत्तर देता येत नसल्याने ही संपूर्ण गोष्ट तिने बनावटी तयार केल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून तक्रार केलेल्या टॅक्सी ड्रायव्हरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याने सर्व आरोप फेटाळत आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. (Breaking News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मूळची केरळची आणि बंगळुरूतील एका खाजगी कॉलेजमध्ये नर्सिंग शिकणारी ही विद्यार्थिनी 6 डिसेंबर रोजी मडीवाला पोलीस स्टेशनमध्ये आली. तिने 2 डिसेंबरच्या रात्री सर एम. विश्वेश्वरैया टर्मिनलजवळ एका टॅक्सी ड्रायव्हरने आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला आणि नंतर खटला अधिकारक्षेत्रानुसार बनसवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

विद्यार्थिनीच्या जबाबावरून पोलिसांनी 33 वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरला पूर्व बंगळुरूमधील त्याच्या घरातून अटक केली. दोन मुलांचा पिता असलेल्या या ड्रायव्हरने तपासादरम्यान सतत स्वतःला निर्दोष सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली.
CCTV फुटेजवरून सत्य समोर…
फुटेजमध्ये 2 डिसेंबर रात्री 11.30 पासून ते 3 डिसेंबर पहाटे 5.30 पर्यंत विद्यार्थिनी आणि ड्रायव्हर एकत्र दिसत होते. दोघेही स्टेशनवर फिरताना, गाडीत बसताना, पुन्हा बाहेर पडताना दिसले. विद्यार्थिनीने सांगितलेले त्याचे कथित साथीदार कुठेही दिसले नाहीत. अखेरीस पहाटे 5.30 वाजता विद्यार्थिनी एर्नाकुलमच्या ट्रेनमध्ये चढताना दिसली.
यानंतर पोलिसांनी ड्रायव्हरचे व्हॉट्सअॅप चॅट्स तपासले असता विद्यार्थिनीने त्याला भेटीनंतरही मेसेजेस पाठवले होते. त्यातून हे संबंध संमतीने घडल्याचे पुरावे स्पष्ट झाले. विद्यार्थिनीला पुन्हा चौकशीसाठी बोलावल्यानंतर तिने कबूल केले की तिने प्रियकरापासून ‘लव्ह बाईट’ लपवण्यासाठी खोटी तक्रार दिली होती.
टॅक्सी ड्रायव्हरनेही पोलिसांना सांगितले की तो विद्यार्थिनीला आधीपासून ओळखत होता कारण दोघेही केरळचे आहेत. त्या रात्री त्याने तिला फक्त स्टेशनपर्यंत सोडले होते. विद्यार्थिनीने त्या वेळी आपल्या प्रियकराला फोन करून पहाटेची ट्रेन पकडणार असल्याचेही सांगितले होते. या संपूर्ण प्रकरणामुळे गंभीर आरोपांचे दुरुपयोग किती धोकादायक ठरू शकतात, यावर चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.







