अजित जगताप
Shivjayanti 2023 | सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कीर्ती जगभर प्रसिद्ध आहे. वडूज येथील बाल मावळ्यांनी अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून अमेरिकेतील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivjayanti) महाराजांनी आग्र्यातून केलेल्या सुटकेची नाट्यरूपातून माहिती दिली. याबद्दल या चिमुकल्या मावळ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शमनेश गुरव यांचा शिवजयंती साजरी करण्यासाठी पुढाकार…
शमनेश गुरव हे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केले आहे. नोकरी- व्यवसाय निमित्त ते सध्या अमेरिकेत राहत असून टेक्सास, न्यू जर्सी, टेनिसी या ठिकाणी त्यांचे वास्तव्य आहे. ‘ त्यांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला.
सीमा विरहित नेतृत्व व एकजूटता”’ या आधारे भारतातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, आसाम ,तेलंगण, तामिळ, केरळ व पंजाब, गुजरात,बिहार, मेघालय, कर्नाटक आदी राज्यातील भारतीय सुपुत्रांच्या सहकार्याने व शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिषद व टेनिसी शहर मराठी मंडळ यांच्या वतीने झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम सादर केला.
या कार्यक्रमाच्या पूर्वी ढोल- ताशा व लेझीम पथकाच्या साह्याने शिवजयंतीला प्रारंभ करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपस्थित असलेल्या छत्रपती शिवराय प्रेमींना ”’छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटका” हे नाट्य सादर केले. या नाटकांमध्ये अकरा वर्षाच्या दर्श गुरव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकार केली.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी भुवनेश्वर अमृतकर, विरल दाभाडे, अश्विनी चौधरी, प्राची बत्रा, पद्मश्री गुरव आदींनी बाल मावळ्यांची जय्यत तयारी करून त्यांच्यातील कलागुणाला वाव देण्यासाठी प्रयत्न केला. दर्श गुरव यानी साकारलेल्या या भूमिकेबद्दल त्याचे इम्रान तथा टिलू बागवान, महेश गुरव, राजू फडतरे, शेखर गुरव,परेश जाधव,धनंजय चव्हाण, विजय शेटे, सुभाष गुरव गुरुजी, सचिन गुरव, विनोद लोहार व पत्रकार अजित जगताप, नितीन राऊत आणि बॉक्सर ग्रुपने अभिनंदन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
महिला दिन विशेष : सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला जिल्हाध्यक्ष : श्रीमती देशमुख
प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी सचिन मोरे यांची नियुक्ती
मराठा महासंघाचे ॲड. पवार व ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे यांना सातारा जिल्ह्यात अभिवादन