दीपक खिलारे
इंदापूर : केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे माध्यमातून व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रयत्नामुळे इंदापूर तालुक्यातील सात गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना शिवसेना -भाजप युती सरकारकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती रविवारी (दि.४) भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड.शरद जामदार यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील सत्तारूढ झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना-भाजपने सरकारने नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिलेली गावे अशी की, वडापुरी – (रु.१३.५५ कोटी, वालचंदनगर – (रु.४६.४५ कोटी, सणसर – (रु.५४.५४ कोटी, उद्धट- प्रादेशिक पाणीपुरवठा योजना – (रु.१०२.६५ कोटी, शेळगाव – (रु.४९.३० कोटी ), भरणेवाडी – (रु.१६.३२कोटी) व कळस- (रु.२७.९७ कोटी)
■ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारकडून देशात हर घर हर जल ही महत्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. सदर कार्यक्रमांतर्गत इंदापूर तालुक्यातील या ७ गावांच्या योजनांना शिवसेना-भाजप सरकारने मंजुरी दिलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड.शरद जामदार यांनी आभार व्यक्त केले.