जीवन सोनवणे
खंडाळा, ता.१६ : नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा गौरव करणे ही आपली परंपरा आहे. नवरात्रात आपण देवीचे म्हणजेच शक्तिरूपाचे जागरण करत असतो. स्त्रीमधील ऊर्जेचे, सामर्थ्याचे ते प्रतीकरूप असते. नवरात्र ही अशीच स्त्री मनाला आणि तिच्यामधील सुप्त सामर्थ्याला दिलेली हाक असते. काही स्त्रियांनी ती आधीच ऐकलेली असते आणि त्यानुसार तिची वाटचाल सुरू झालेली असते. काहींना ती नव्याने खुणावते. एकविसाव्या शतकात वावरताना प्रत्येक व्यक्तीला येणारे आव्हान ही संधी आहे, असे वाटते. खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई या त्यापैकीच एक आहेत. कोरोनासारख्या साथीच्या रोगाने त्यांना जास्त तास काम करण्यास भाग पाडले; पण वृषाली कर्तव्यापासून मागे हटल्या नाहीत. त्यांच्याच संघर्षाची ही गाथा…
पोलीस दलाचा भाग बनणे हेच महिलांसाठी आव्हानात्मक आहे. सकारात्मक आणि सुरक्षित समाज निर्माण करण्यास मदत करणार्यांसाठी ही एक संधी आहे. यात जोखीम आणि त्यागांचाही समावेश आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना सण किंवा विशेष प्रसंगी कुटुंबासोबत पुरेसा वेळ घालवता येत नाही. त्यांनी आपले जीवन प्रथम देशाच्या सेवेसाठी आणि नंतर कुटुंबासाठी समर्पित केले आहे. कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेशी निगडीत पोलिसांची उग्र बाजू आपण भूतकाळात पाहिली आहे. पण नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशीच पोलिसांच्या कामाची पद्धत असते. पोलिसांची हळवी बाजू आपण क्वचितच पाहतो; परंतु गेल्या अनेक महिन्यांत आपल्याला त्याची झलक पहायला मिळाली. खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या वृषाली देसाई या आदीशक्तीचे कार्य देखील इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
कार्य इतरांसाठी देखील प्रेरणादायी
युवक-युवतींचे प्रेरणास्थान म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक असणाऱ्या खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या वृषाली देसाई यांच्याकडे पाहिले जाते. कर्तव्यदक्ष पोलीस स्त्री आणि दोन मुलींची समर्पित आई असूनही वृषाली अशोक देसाई या आजही कर्तव्यात कुसूर न करता खंबीरपणे उभ्या आहेत. कोरोनासारख्या साथीच्या रोगाने त्यांना जास्त तास काम करण्यास भाग पाडले; पण वृषाली कर्तव्यापासून मागे हटली नाही. तिची कर्तव्ये पार पाडण्यासाठी, नागरिकांना मदत करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तिला तिच्या लहान मुलांसोबतचा वेळ घालवण्यास पुरेसा वेळ मिळत नव्हता. असेअसतानाही त्यांनी जनतेच्या आणि आपल्या वर्दीच्या कर्तव्यात झोकून दिले.
कर्तव्यदक्ष महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली अशोक देसाई या सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलिसांचा एक भाग आहेत. पुणे-सातारा सीमेवरील कष्टकरी चेक पोस्टवर कोरोना काळात त्या कर्तव्यावर होत्या. लॉकडाऊनच्या काळात त्या सहा महिने दररोज सुमारे १६ तास कर्तव्यावर होत्या. जबाबदारीची जाणीव असल्याने त्यांनी स्वतःला मुलांना भेटण्यापासून रोखले. मुलांशी फक्त संवाद साधत त्यांनी परिस्थिती हाताळली. त्यांची मेहनत उच्चपदस्थांनी आणि सहकाऱ्यांनी ओळखली आणि भरभरून कौतुक केले. त्यानंतर सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. वृषाली देसाई त्यांच्या कर्तव्याशी प्रामाणिक आहेत. त्यांना आपल्या नोकरीचा अभिमान आहे. विश्वास आहे की, ते तिला सर्वोच्च प्राधान्य देण्यास पात्र आहे. ‘आधी खाकी मग बाकी’ या मराठी म्हणीवर त्यांचा विश्वास आहे. जे वाक्य त्यांचे गणवेशावरील प्रेम दर्शवते. असे समर्पित अधिकारी मिळणे हे पोलीस दलाचे भाग्य आहे. आपल्या कामातून ते खात्याची प्रतिमा उंचावतात.
महिला पोलीस उपनिरीक्षक असलेल्या वृषाली देसाई यांनी आपल्या कामातून दाखवून दिले की, शिरवळ भागात त्यांना ‘लेडी सिंघम’ असे का म्हटले जाते. शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चोरीच्या गुन्ह्यातील अनेक अट्टल गुन्हेगार टोळ्यांचा परराज्यात जाऊन पर्दाफाश केला आहे. शिरवळ पोलीस स्टेशन याठिकाणी दाखल असलेल्या औद्योगिक भागातील चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेऊन, त्यांना मुद्देमालासह पकडले आहे. म्हणूनच पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या धाडसाचे, कष्टाचे आणि त्यागाचे कौतुक करणे क्रमप्राप्त ठरते. आजच्या युवा पिढीसाठी त्या एक प्रेरणास्थान आहेत.
पोलीस खात्यात काम करत असताना खूप प्रसंगांना अडी-अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु पतीची असलेली खंबीर साथ, मुलांचे प्रेम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास यामुळेच काम करण्यासाठी बळ मिळते.
– वृषाली देसाई, महिला पोलीस उपनिरीक्षकआमच्या पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून वृषाली देसाई यांची ओळख आहे. आपल्या कर्तव्यात कुसूर न करता, कोणत्याही क्षणी आपले कर्तव्य पहिले म्हणून चालणारे अधिकारी कमी असतात. देसाई या त्यापैकीच एक आहेत.
– नवनाथ मदने, पोलीस निरीक्षक, शिरवळ
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirwal News : बंद असलेल्या शिर्के पेपर मिलला भीषण आग
Shirwal News : शिरवळ हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सातारा, पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार
Pune News : गावठी दारू अड्ड्यावर छापा; तब्बल 7 लाखांचा मुद्देमाल नष्ट; शिरगाव पोलिसांची कारवाई