Shirur News शिरूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सन्माननिधी दिल्या जातो. (Shirur News) या योजनेचा लाभ घेण्याकरिता ई -केवायसी व आधार सिडींग पूर्ण करणे आवश्यक आहे. (Shirur News) त्याअनुषंगाने आज मंगळवार (ता. 20 व बुधवारी (ता.21) सकाळी 8 ते सायं. 6.30 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकाच वेळी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. (Shirur News) या शिबीरांचा पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. (Shirur News) असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी केले आहे. (Shirur News)
लाभार्थीने ई-केवायसी व बँक खाते आधार सलग्न करणे आवश्यक
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीतील 14 वा हप्त्याचा लाभ वितरणाची कार्यवाही सुरू आहे. याकरीता लाभार्थीने ई-केवायसी व बँक खाते आधार सलग्न करणे आवश्यक आहे.
ई-केवायसी व बँक खाते आधार सलग्न करण्याकरिता गाव पातळीवर जिल्ह्यात एकाच वेळी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी प्रलंबित लाभर्थ्यांची ई-केवायसी व आधार सिडींग पूर्ण करून घेण्याकरिता आपल्या गावातील कृषि सहायकाकडे याद्या उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
याकरीता संबंधित कृषि सहायक, सामाईक सुविधा केंद्र, इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांची मदत घ्यावी. मंगळवार ( ता. २० ) जांबुत ( ता. शिरूर ) येथील महा-ई-सेवा केंद्रामध्ये प्रलंबित लाभार्थीची इ केवायसी करण्यात आली. आधार सिडींग बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, यासाठी महा ई सेवा केंद्राचे मालक गुलाब जोरी तसेच मंडल कृषी अधिकारी शिरूर अंकुशजी परांडे, कृषी सहायक अशोक जाधव व कृषी मित्र विकास जगताप यांनी मार्गदर्शन केले व परिश्रम घेतले.