Political News : मुंबई : माझ्या आयुष्यात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. बारावीनंतर मला शिकता आलं नाही. पण मनातली जिद्द मला स्वस्थ बसू देत नव्हती. वेळ मिळेल त्याप्रमाणे मी यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून पदवी घेतली. पुणे टिळक विद्यापीठातून एम.ए. चं पहिलं वर्ष पूर्ण केलं. दुसरं वर्ष पूर्ण करणार होतो, तेवढ्यात ऑपरेशन २०२२ सुरु झालं. आता एम. ए. करत बसलो, तर ते राहून जाईल. कारण ते राज्याचं ऑपरेशन होतं. पण मला संधी मिळेल तेव्हा मी नक्कीच एम.ए. चं दुसरं वर्ष पूर्ण करेन. चिकाटी आणि जिद्द असेल, तर अशक्य काही नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.(Political News)
माझ्या आयुष्यात शिक्षणाला खूप महत्त्व आहे.
भांडूप येथे शिक्षण महर्षी रामचंद्र सावंत यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि गुलदस्ता या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हा किस्सा सांगितला. शिंदे म्हणाले की,(Political News) बारावीनंतर मला शिकता आलं नाही. पण मी माझ्या मुलाला डॉक्टर बनवलं. मात्र, आजही मी त्याचं हॉस्पिटल करुन देऊ शकलो नाही. कोविड काळाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, कोविड काळात मी लोकांना भेटत होतो. मला त्यावेळी वाटलं होतं की नक्कीच मलाही कोविड होईल. तसा तो मला झालाही. एकदा नाही तर दोनदा झाला. पण पुण्याईमुळे मी यातून बरा झालो. मुंबईत नालेसफाई केल्यानंतर कुठला मुख्यमंत्री गेला होता? मी गेलो होतो, मला त्यात कमीपणा वाटत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.(Political News)
आपलं जे सरकार आहे ते गतिमान आणि काम करणारं सरकार आहे. त्यामुळे अनेकांना पोटदुखी सुरु झाली आहे. आपलं चांगलं काम बघून हिशोब मागू लागले आहेत. कॅगने ऑडिट केलं आहे. आम्ही आल्यानंतर क्राँकिटचं काम असंच करत राहिलो. मुंबई येत्या दोन ते तीन वर्षांत खड्डेमुक्त होईल, हे तुम्हाला आश्वस्त करत आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पंधरा वर्षांपूर्वीच हे काम केलं असतं तर साडेतीन हजार कोटी रुपये वाचले असते. याचं उत्तर कोण देईल? त्याचं उत्तर द्यावंच लागेल.(Political News)