Shirur Muharram News शिरूर :
तेरे दरबार मे दिल थाम के वो आता हे
जिसको तु चाये ये नबी तू बुलाता हे
तेरे दर पर सर झुका कर मे भी आया हू
जिसकी बिगडी हाय नबी चाहे तू बनाता है
भर दो झोली मेरी या मुहम्मंद लोट कर मै न जाऊ खाली…
बॅण्ड वर सुरेख वाजविलेल्या कव्वाल्या. (Shirur Muharram News)
या हुसेन… या हुसेन… या गर्जना, सवाऱ्यांचा थरार, पंजे भेटी तून भावनीक सोहळ्याचे दर्शन, सरबत व प्रसादाच्या वाटपातून मोहरम निमित्त बारामतीच्या अमर ब्रॅण्ड सादर केलेल्या कव्वाली व देशभक्तीपर गितांच्या सुरांनी मोहरम सणांच्या महतीत भर घातली. अधुन मधून येणारा हलकासा पासून म्हणजे निसर्ग देखील या मोहरम सणांमध्ये सामिल झाल्याचे दिसून येत होता. या मिरवणूकीत सर्वधर्मीय सहभागी झाल्याचे दिसून येत होते. (Shirur Muharram News)
मोहरम सण म्हणजे शिरूर शहराला लाभलेली संस्कृती व एक इतीहास समजला जातो. भाजी बाजारातून ताजामुल्ला शहा ताबूताची विधीवहत धार्मीक पठण करून मिरवणूसाठी सज्ज करण्यात आला. यावेळी बारामतीच्या अमर बॅण्ड ने सादर केलेल्या कव्वाली ने सगळ्याच्या ह्दयातील भावना उंचावल्या गेल्या.
मलंगशहा बाबा दर्ग्यामध्ये तिलावते कुराण पठण झाल्यानंतर वाद्याच्या गजरात या ताबूताची मिरवणूक काढण्यात आली. हा ताबूत आडत बाजारातील छालवाले ताबुताजवळ आल्यानंतर मिरवणूक रंगली. हा ताबूत आडत बाजारातील छालवाले ताबूताजवळ आल्यानंतर मिरवणूकीला जोश आला. या दोन्ही मुख्य ताबूतांच्या पुढे विविध ठिकाणचे कोटले व मोहल्यांचे पंजे व सवाऱ्या होत्या. काहि ठिकाणी पंजे सवाऱ्या ह्या जागेवरच विसर्जीत करण्यात आल्या.
पाच कंदिल चौकात आमदार अशोक पवार व पोलिस निरीक्षक संजय जगताप हे शिरूर सहर मुस्लिम जमातला च्या वतीने तक्सिम शरबत ‘यादे शोहदाने करबला’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिलावते दुवा झाल्यानंतर येथील सरबत वाटप सुरू करण्यात आले.
दरम्यान, अल मदद बैतुलमल कमिटीचे अध्यक्ष फिरोज बागवानयांनी स्वागत केले. मुस्लिम जमातच्या वतीने मिरवणुकीतील सहभागींना सरबताचे वाटप करण्यात आले. मौलाना कैसर फैजी यांनी मोहरम सणाचे महत्व विशद केले. करबला मैदानावर पंजे भेटी करण्यात आल्या. यावेळी ज्यांनी या दिवशी उपवास ( रोजा ) केला त्यांनी धार्मिक पद्धतीने रोजा सोडला. त्यानंतर ताबूत व सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले. यानंतर मोहरमचे अलविदा पठण करण्यात आले.
यावेळी छालवाले ताबूत बनविणारे केरूभाऊ गाडेकर, मतीन पठाण, बाळासाहेब घावटे यांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र क्षिरसागर, चंद्रकांत बोरा, शेखर पाचुंदकर, शरद कालेवार, विनोद भालेराव, मंगेश खांडरे, रवींद्र सानप, रमाकांत बोरा, सुशांत कुटे, अविनाश घोगरे, निलेश खाबीया, प्रा. अमोल शहा, सुनील करळे आदी यावेळी उपस्थित होते. मुस्लिम जमातचे इक्बालभाई सौदागर, माजी नगराध्यक्ष नसीम खान, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, मुजफ्फर कुरेशी, हाफीज बागवान, अब्दुल वहाब पटेल, शाबान शहा, हुसेन शहा यांनी मिरवणुकीचे संचलन केले होते. शांततेत झालेल्या या मोहरम विसर्जनात शिरूर पोलिस स्टेशनने बंदोबस्त ठेवला होता.