मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या काही आमदारांनी त्यांच्या गटाच्या मंत्र्यांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केलीय. तक्रार यादीत दोन ते तीन मंत्र्यांची नावे आघाडीवर आहेत. आमदारांनी कामं होत नसल्याचा ठपका ठेवत अशा तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. मंत्र्यांना वारंवार सांगूनही कामं केली नसल्याच्या तक्रारी आमदारांनी याआधी केल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर येणार का? आणि काय कारवाई करणार का असा सवाल उपस्थित झालाय.
आमदारांनी सहा महिन्यांचा लेखाजोखा आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. त्यात 15 ते 20 आमदारांनी दोन ते तीन मंत्र्यांची तक्रार केली आहे. या अगोदर देखील आमदार नाराज असल्याच्या चर्चा अनेक वेळा समोर आल्या होता. कोणत्या दोन ते तीन मंत्र्यांवर आमदार नाराज आहेत त्या आमदारांची नावे समोर आलेली नाही. हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात काही मंत्र्याची खाती आणि मंत्री बदलण्याची शक्यता आहे
तानाजी सावंत हे सध्या विरधकांच्या रडारवर आहे. सध्या त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे तानाजी सावंतांविषयी सत्ताधारी पक्षामध्ये काय भूमिका आहे हे पाहावे लागणार आहे. तसेच संदीपान भुमरे आणि दीपक केसरकर यांच्या नावाची देखील चर्चा होत आहे. दहापैकी दोन ते तीन मंत्री कोण आहे याबाबत अद्याप कोणती माहिती आलेली नाही.