(Sheetal Mhatre) मुंबई : शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा माॅर्फ व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकारण चांगलचे तापले आहे. याप्रकरणी संशियित आरोपींना देखील पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडीओ व्हायरल करण्यामागे ठाकरे गटाचे नेते असून या नेत्यांनी हा व्हिडीओ व्हायरल करायला सांगितल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. विधान सभेतही यावरुन खडाजंगी झाली होती.
महिला आयोगाने घेतली दखल ..!
आता, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. म्हात्रे ह्यांच्या व्हिडिओ प्रकरणी गृह विभागाने योग्य ती कारवाई तात्काळ करावी. असे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. शीतल म्हात्रे यांच्याबाबतीतचा व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला जात आहे. ह्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.
राज्यातील महिला लोकप्रतिनिधींना माध्यमांवरून ट्रोल करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. लोकप्रतिनिधींबाबत जर असे प्रकार होत असतील तर समस्त महिला वर्ग राज्यात सुरक्षित आहेत का हा प्रश्न आहे. महिलांना सायबर सुरक्षा प्रदान करणे हे ही तितकेच महत्वाचे आहे.
अशा प्रकरणांमध्ये सायबर गुन्हे विभागाने गांभीर्याने आणि तातडीने कारवाई केल्यास त्याला वेळीच पायबंद होईल. श्रीमती म्हात्रे ह्यांच्या व्हिडिओ प्रकरणी गृह विभागाने योग्य ती कारवाई तात्काळ करावी व यामागील नेमके सत्य समक्ष आणावे. असे चाकणकर म्हणाल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Chitra Wagh News : शीतल तू लढत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत..चित्रा वाघ
प्रेयसीला निर्दयीपणे लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करणाऱ्या प्रियकराला मिर्जापुरमधून अटक
Pune News : वाहतूक नियमन सोडून वसुली करणे पडले चांगलेच महागात ; पोलीस कर्मचारी निलंबित!