Share Market : मुंबई : शेअर बाजाराने आज विक्रमी सुरूवातीसह इतिहास रचून ६४ हजार अंकांचा टप्पा ओलांडला. यामुळे बाजारात उत्साह आला होता. आज मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख संवेदनशीर सेन्सेक्सने ६४,०१३.६३ असा दिवसासह सर्वकालीन उच्चांक गाठला. सध्या सेन्सेक्स ५८७ अंक वाढीसह ६४,००३ अंकांवर पातळीवर आहे. निफ्टी देखील १८२ अंकांच्या मजबूत मुसंडी मारत प्रथमच १९,००० अंकांवर पोहोचला आहे. त्याचा आजचा उच्चांक १९,००५.५० आहे, जो निर्देशांकाचा आतापर्यंतचा उच्चांक आहे.(Share Market)
शेअर बाजाराने आज विक्रमी सुरूवातीसह इतिहास रचून ६४ हजार अंकांचा टप्पा ओलांडला.
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक सल्लागार व्ही. के. विजयकुमार म्हणाले की, आजच्या विक्रमामुळे बाजारात नवा उत्साह आला आहे.(Share Market) असे असले तरी बाजाराचे वाढलेले मूल्यांकन नजीकच्या काळासाठी चिंतेचा विषय असू शकते. त्यामुळे गुंतवणूकदार या विक्रमी उच्चांकावर काही नफा बुक करू शकतात. सेन्सेक्समधील टाटा मोटर्स, एसबीआय, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, टायटन आणि आयटीसी तेजीसह उघडले, तर पॉवर ग्रिड, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा, एनपीटीसी आणि एचसीएल टेकची घसरणीसह सुरूवात झाली. कंपनीला गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून ८५७ कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी स्वीकृती पत्र मिळाल्याने टिटाग़ड रेल सिस्टम्सचे शेअर्स पाच टक्क्यांनी वाढले.(Share Market)
सुरुवातीच्या व्यवहार सत्रात सेन्सेक्स ६३,७०१.७८ या नवीन सर्वकालीन उच्चांकावर खुला झाला तर निफ्टीने इतिहास रचला आणि १८,९०८.१५ अंकांच्या सर्वकालीन उच्चांकावरून दिवसाच्या व्यवहाराला घोडदौड सुरू केली. मार्केटच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीच्या ५० पैकी ३८ हिरव्या तर १२ लाल रंगात रंगले होते. (Share Market) अदानी एंटरप्रायझेस, डिव्हिस लॅब, एसबीआय, टाटा मोटर्स आणि अदानी पोर्ट्स निफ्टी टॉप गेनर्समध्ये होते तर एचडीएफसी लाईफ, पॉवर ग्रिड, ओएनजीसी, सिप्ला आणि अल्ट्राटेक सिमेंट हे निफ्टी टॉप लूजर्समध्ये ठरले.(Share Market)
फेडरल रिझव्र्हच्या आक्रमक व्याजदर वाढीचा योग्य परिणाम दिसून आल्याने अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी जोरदार तेजी नोंदवली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज ०.६३ टक्के वाढले, S&P ५०० निर्देशांक १.१५% वाढले आणि नॅसडॅक कंपोझिट निर्देशांक १.६५ टक्क्यांनी वाढले. अमेरिकन बाजारातील तेजीचा परिणाम आशियाई बाजारांवरही दिसून आला. जपानचा निक्केई १.६६ टक्क्यांनी वाढला, तर चीनचा शांघाय कंपोझिट ०.५२ टक्क्यांनी घसरला. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ५ पैशांनी वाढून ८१.९७ डॉलरवर पोहोचला.(Share Market)