अजित जगताप
गोंदवले : भारत देशामध्ये गाईला दैवत मानले जाते. गाईंची सेवा करणे म्हणजे ईश्वर सेवा करणे.त्यामुळे गोंदवलेकर महाराज यांच्या संस्थांनमध्ये सुमारे ऐंशी गाईची सेवा पाहण्यास मिळत आहे. स्वामींच्या आगमनापासूनच या ठिकाणी गोमातेचे सेवा केली जाते.
गोंदवलेकर, श्री ब्रह्मचैतन्य महाराज : (१९ फेब्रुवारी १८४५ — २२ डिसेंबर १९१३). महाराष्ट्रातील एक संत-सत्पुरुष. त्यांचे पूर्ण नाव गणपत रावजी घुगरदवे. त्यांचे घराणे हे गोंदवले गावाचे कुलकर्णी घराणे असून सुस्थितीत होते.त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील, माण तालुक्यातील गोंदवले या गावी झाला.याच ठिकाणी गोशाळा, जनावरांचे खाद्य भांडार व पिण्याच्या पाण्यासाठी तलाव बांधण्यात आला आहे.
या गोशाळेत आज गाईची सेवा केली जाते. या ठिकाणी गीर, जर्सी, देशी प्रकारच्या गाई या बंदिस्त गोशाळेमध्ये असून खोंड व बैल सुद्धा आहेत .वैरण ,कडबा, पशुखाद्य ,पेंड आदी या ठिकाणी विकत व देणगीतून घेतली जाते. तसेच नित्यनियमाने पशुवैद्यकीय अधिकारी गाईची पाहणी करतात.
कणेरी मठ येथे झालेल्या गोशाळेतील विष बाधा प्रकरणा नंतर गोशाळेबाबत कडक नियमावली करण्याचा राज्य शासन विचार करत आहेत. त्यामुळे एक पायलेट प्रोजेक्ट म्हणून गोंदवलेकर महाराज येथील संस्थांनमधील असलेल्या गोशाळेचे पाहणी करावी. असे नमूद करावे वाटत आहे. अत्यंत स्वच्छ व निसर्गरम्य अशा परिसरामध्ये या गोशाळे शेजारीच गाईंना पिण्याच्या पाण्यासाठी एक तलाव बांधण्यात आलेला आहे. तसेच या ठिकाणी आलेला सर्व कडबा व वैरण याची परिपूर्ण तपासणी करून त्यानंतरच ते गाईला देण्यात येत आहे.
सदरच्या ठिकाणी असलेल्या गाईच्या दुधापासून हे दूध खोंडाला देऊन त्यांचे जोपासना केली जाते. या गोशाळेत तेथील सेवेकरी व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जात नाही. कारण, या गाईंना खाद्य दिले व विष बाधा होऊ नये. याची स्थापने पासूनच काळजी घेतली गेली आहे. ही खबरदारी घेतल्यामुळे गाई ज्या वेळेला वयोवृद्ध होते आणि त्याचा नैसर्गिक मृत्यू होतो.
त्याचवेळी त्यांना त्या गोशाळेतून बाहेर काढले जाते.गाईची निगा राखली जाते. गाईची काळजी घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने कडबा व पेंड विकत घेतली जाते. तसेच शेतकरी वर्ग कडबा देणगीच्या रूपाने ही देत आहेत.