अजित जगताप
Satara News : सातारा: बदली ही प्रशासनातील प्रक्रिया आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर त्या बदली संदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जातात. परंतु, त्याला बगल देऊन विकासात्मक व रचनात्मक कार्याला प्राधान्य देण्याची घोषणा नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र दूडी यांनी सातारा येथे झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत केली. (New Satara Collector Satish Dudi hold charge…)
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांची तातडीने बदली झाली. त्यांचा कार्यकाल पूर्ण झाला नसतानाही त्यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र दुडी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम दैनिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भेट देऊन शुभारंभ केला.
त्यानंतर सातारा जिल्हाधिकारी कार्यालय शेजारील नियोजन भवनात पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तर दिली. (Satara News)
सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका
जिल्ह्याच्या विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना अधिक गतिमान करणे. तसेच घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे. महाबळेश्वर पाचगणी येथील आराखडा पुन्हा एकदा तपासून पर्यटन स्थळ वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. (Satara News) प्रत्येक गोष्ट सकारात्मक घेऊन जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा अशा दृष्टीने कामकाज करताना सर्व समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागेल .असे त्यांनी स्पष्ट केले.
फलटण निरा तरडगाव बरं या सर्व भागातील पालखी स्थळाची त्यांनी पाहणी केली. यावेळेला दिव्यांग व्यक्तींचे प्रश्नाला त्यांनी स्पर्श केला. (Satara News) आगामी सहा महिन्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील विकास काम अधिक गतीने व्हावी. यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळेला सातारा जिल्ह्यातील महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सातारा येथे नूतन जिल्हाधिकारी यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेला प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींसोबत अनेक मान्यवरांनी जिल्हा नियोजन भवनात गर्दी केली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News : वडाच्या पूजेसोबतच अलिकडे न्यायालयात घटस्फोटाचे दावे सुद्धा वाढले
Satara News | फांदीने साथ सोडली पण पारंब्याने हात दिला…