(Satara News) : सातारा : साताऱ्याच्या भूमीमधील अनेक कलाकृती, खाद्यपदार्थ व ऐतिहासिक भूमी असलेल्या वस्तूला जगभरात खूप मोठी मागणी आहे. त्यामुळे सातारच्या कंदीपेढ्यानंतर आता येथील प्रसिद्ध हॉटेल चंद्र विलास येथील डिंक लाडू सध्या आखाती देशातील मदीना शहरात पाठवण्यात आलेले आहे.
सातारा शहरातच लाडू मिळत असल्याने मागणीत वाढ …!
सातारा शहरातील प्रसिद्ध अशा चंद्र विलास हॉटेल मधील डिंक लाडू वडूज ता खटाव येथील उद्योजक इम्रान बागवान यांनी काही दिवसांपूर्वी आखाती देशात पाठवले होते. त्या डिंक लाडूची चव व त्याचा पौष्टिक पदार्थ खाऊन अनेकांनी कौतुक केले.
तेव्हापासून आज मदीना शहरात वडूज व पश्चिम महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविक व पर्यटकांना साताऱ्यातील डिंक लाडू आणण्याची फर्माईश केली जाते. सध्या खजूर, ड्रायफ्रूट, काजू, बदाम, पिस्ता, गुळ, डिंक तसेच इतर पौष्टिक पदार्थांपासून हे डिंक लाडू तयार केले जातात. साधारण साडे सहाशे ते सातशे रुपये किलो असलेले हे डिंक लाडू किमान महिनाभर टिकतात. अशा पद्धतीने ते तयार करतात. हॉटेल चंद्रविलास, मोती चौक, सातारा शहर परिसर याच ठिकाणी हे डिंक लाडू मिळतात. त्यामुळे शोरूम मधील काचेच्या बॉक्स मध्ये डिंक लाडू दिसले की, अनेक ग्राहक वर्ग ते विकत घेतात. त्यामुळे या डिंक लाडू ला तसेच इतर पदार्थांना मोठी मागणी आहे.
साताऱ्यातील हॉटेल व्यवसायामध्ये माणुसकी व सामाजिक कार्याची जोड देणारे वसंत शेठ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जोशी बंधू तसेच आचारी कलावंत व कर्मचारी वर्ग नम्रपणाने ग्राहकांची सेवा करत आहेत. आज वडूजचे माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव पत्रकार अजित जगताप व उद्योजक इम्रान बागवान,धनंजय चव्हाण यांना हॉटेल चंद्र विलास चे मालक वसंत शेठ जोशी यांनी डिंक लाडू चा आस्वाद दिला. या लाडूला सध्या मोठी मागणी असून अमेरिका, जपान तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ,स्विझर्लंड ,आफ्रिका, आखाती देशात ठिकाणी वास्तव्यास असलेले आपल्या भारतीय नागरिकांसाठी सुद्धा हे डिंक लाडू पाठविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
WomenDay Special : वडूज नगरीत रंगला खेळ पैठणीचा