अजित जगताप
Satara News | वडूज : खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीमध्ये नगरपंचायत स्थापना झाल्यापासून अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. परंतु, कर भरणा तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने कर्मचाऱ्यांना व विश्वस्त असलेल्या नगरसेवक- नगरसेविकांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यंदा मात्र दोन कोटी सहा लाख रुपये कर आत्तापर्यंत वसूल करून नगरपंचायतीने दमदार कामगिरी केलेले आहे.
गेल्यावर्षी २०२१-२२ रोजी ५५.२१ टक्के घरपट्टी व ४८.५७ टक्के पाणीपट्टी वसूल करण्यामध्ये यश मिळाले होते. सन२०२२-२३ रोजी घरपट्टी ६३.३२ टक्के व पाणीपट्टी ५४.५ टक्के वसूल करण्यात आली आहे. सदर वसुली मोहिमेसाठी जागोजागी फलक, सोशल मीडिया व रिक्षातून जनजागृती करण्यात आली होती. तरी काही महाभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर नळ जोडणी १५७ व २१० जप्तीची नोटीस काढण्यात आलेली आहे.
वडूज नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसतानाही कर्मचाऱ्यांनी स्वबळावर केलेली हे नेत्र दीपक कामगिरी कौतुकास्पद आहे.नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी पद हे प्रभारी असल्याने या ठिकाणी मुख्याधिकारी विना कर्मचाऱ्यांनी केलेली कामगिरी ही भविष्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट ठरलेली आहे. राज्य शासनाने वडूज नगरपंचायतीला स्वतंत्र मुख्याधिकारी नियुक्ती केल्यास अनेक विकास कामे गतिमान होतील. अशी आता खात्री पटू लागलेली आहे.
वडूज नगरपंचायतीचे कर निरीक्षक मकरंद जाधव व वसुली पथकांमधील धनाजी कांबळे, विजय शिंदे ,शिवाजी फडतरे, राजेंद्र काटकर, संदीप फडतरे, विशाल बैले व त्यांना सहकार्य करणारे प्रसाद जगदाळे, विशाल जमदाडे, तसेच दीपक पोद्दार ,सागर लंगडे, सचिन वलेकर ,वैभव चव्हाण, मनोज पवार, दीपक रायबोले, आदींनी अक्षरशा अवघड कामगिरी सोपी करून लोकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
याबाबत नगरपंचायत प्रशासनाने त्यांचे कौतुक केले आहे. सध्या कर भरण्याबाबत विलंब लागल्यास विलंब आकार लावण्यात येणार आहे असा फलक जरी नगरपंचायतीच्या दारात लावला असला तरी अद्यापही करदात्यांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरलेली नाही. मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन सुद्धा करदात्यांना कर भरताना संकोच वाटू लागलेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पाहता नागरी सुविधांचा अभाव असल्याने जे कर भरतात त्यांना नागरी सुविधा देणे हे निवडून नगरपंचायतीची जबाबदारी असून कारवाई होत असताना डाव्या व उजव्या बाजूकडे न पाहता थेट कारवाई होणे अपेक्षित आहे.
सध्या सर्वजण आर्थिक अडचणीत असून महागाईने सर्वजण त्रस्त आहे .अशावेळी किमान पाणीपट्टी कमी व्हावी अशी मागणी वडूज नगरीचे माजी सरपंच अनिल माळी यांनी करून या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला पाणीपट्टी तर माफ करून घ्यावी तसेच वडूज नगरीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून एक आदर्श नगरी घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे काही जाणकार लोकांनी सुचित केलेले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Satara News : संविधान रक्षणासाठी लढणे आवश्यक ; शाहीर संभाजी भगत
Satara News : वडूज नगरीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप सरकारचा निषेध आंदोलन…!