अजित जगताप
Satara News : सातारा : पती-पत्नीचे नाते हे जन्मोजन्मी टिकावे. अशी आपली भारतीय संस्कृती आहे. या भारतीय संस्कृतीला बळकटी देण्याचे काम अनेक सणासुदीने केलेले आहे. प्राचीन काळापासून वटपौर्णिमेला वडाची पूजा करून जन्मोजन्मी असा पती मिळावा अशी एकीकडे विनंती करण्यात येत आहे तर दुसऱ्या बाजूला पतीपासून घटस्फोट मिळावा म्हणून न्यायालयात दावे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही चिंतेची बाब ठरली आहे.(Along with the worship of Vada, divorce claims have also increased in the courts recently)
याबाबत माहिती अशी की,वटपौर्णिमेला माता- भगिनी वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने वडाच्या पूजेलाही महत्व आलेले आहे. (Satara News ) मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे. धन धान्य व मुले नातवंड यांचा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे. अशी प्रार्थना करतात. परंतु, खऱ्या अर्थाने शिक्षणाचे महत्व सांगणारी शिक्षण माता सावित्रीबाई फुले हे तमाम स्त्रियांसाठी आराध्य दैवत ठरलेले आहेत. त्यांची पूजा करणे. हे सर्व मुली व महिलांचे कर्तव्य आहे. अशा शब्दात पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या ऋतुजा भागवत- गडांकुश, करिश्मा सय्यद यांनी सांगितलेले आहे.
राज्यात दररोज ५ हजार दावे दाखल होतात
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असून प्रत्येक झाडाच्या सावलीला महत्त्व आलेले आहे. सर्वाधिक सावली देणारे व आपला विस्तार करणारा वड हे झाड आपल्या जमिनीमध्ये अनेक मुळ्या सोडून घट्ट पाय रोवून राहतात. तशा पद्धतीने महिला आपल्या संसारामध्ये टिकून राहिलेले आहेत. ही एक जमेची बाजू असली तरी दुसऱ्या बाजूला विदारक चित्र असून महिलाच महिलांवर (Satara News ) काही ठिकाणी अन्याय करत आहेत. सध्या दोन महिन्यापासून ते 30 वर्षापर्यंत कौटुंबिक न्यायालय व इतर न्यायालयामध्ये घटस्फोट व सोडचिट्टी चे प्रमाण वाढलेले आहे. याला जबाबदार काही महिला नातेवाईक आहेत. दररोज किमान महाराष्ट्राचा विचार केला तर पाच हजार अशा पद्धतीचे दावे न्यायालयात दाखल होतात.
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा दाव्याला वाढ झाल्याचे दिसून आलेले आहे. कलम १३(१)१३(अ)१३(१ ब)अशा कलमाखाली दावे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा लवकर निकाल लागत नाही. हे सुद्धा समोर आलेले आहे. (Satara News ) महिला वर्गाला संरक्षण मिळावे. हा त्यांचा नैतिक अधिकार आहे. तो अधिकार सर्वांनीच पाळला पाहिजे. सध्या जागतिक स्तरावर बालिका दिन ,महिला दिन, मातृदिन असे अनेक दिन साजरे होतात. पण, त्याला मनापासून दाद मिळत नाही. एक औपचारिकता आलेले आहे. अलीकडच्या काळामध्ये सावित्री व सत्यवान हा प्रत्येक घरात असावा असे वाटत असले तरी तो काळाचा लुप्त झालेला आहे.
आज वटसावित्री वृत्त पाळणे दुरापास्त झालेले आहे कारण काही महिलांना दररोज बचावासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता पूर्वीच्या काळी जी वटपौर्णिमा साजरी होत होती. ती कालांतराने एक फॅशन बनली आहे. सकाळी ब्युटी पार्लर,,,(Satara News ) दुपारी वडाची पूजा आणि सायंकाळी पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण असे त्याचे स्वरूप आलेले आहे. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण म्हणजे एक फॅशन बनलेली आहे. हे आता नकारू शकत नाही.
जुन्याकाळी महिला वर्गाने करवा चौथ, हरितालिका, कोकिळावृत्त आणि वटसावित्री साजरी करताना नवरात्र उत्सव, गौरी गणपतीला ही पूजाअर्चा केलेली आहे. नागपंचमी, रंगपंचमी सणाला आनंद साजरा केला आहे. परंतु अलीकडच्या काळात होणारी वटपौर्णिमेची (Satara News ) पूजा श्रद्धे ऐवजी फॅशन बोलू लागले आहे हे ही तितकंच खरे कारण पुढे आले आहे. याचा आता सर्व समाज विचार करू लागला आहे. महिला मुक्तपणे पण, नैतिकता सांभाळून जीवन जगण्यात अर्थ आहे असे मानतात. त्यामुळे एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे असे ही मत व्यक्त केले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News | फांदीने साथ सोडली पण पारंब्याने हात दिला…