Satara News : सातारा : त्यांचा संपूर्ण दिवस आनंदात गेला. रात्री घरी आल्यानंतर कुटुंबासोबत सुखासमाधानाने जेवण केले. रात्री नेहमीप्रमाणे आयुर्वेदिक काढा प्यायले आणि झोपी गेले ते पुन्हा कधीच न उठण्यासाठी… साताऱ्याजवळील फलटण शहरातील रहिवाशी हणमंतराव पोतेकर व अमित पोतेकर या पिता-पुत्रांबाबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पोतेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
फलटणमध्ये पिता-पुत्राचा करुण अंत!
फलटण शहरात गजानन चौक येथे राहणारे हणमंतराव रामभाऊ पोतेकर (वय ५५) व त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर (वय ३२ ) यांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले. (Satara News) जेवणानंतर आयुर्वेदिक काढा पिण्याच्या सवयीनुसार घरातील सर्वांनीच हा काढा प्यायला आणि गाढ झोपी गेले.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अचानक हणमंतराव व त्यांचा मुलगा अमित आणि मुलीला त्रास जाणवू लागला. त्रास असह्य वाटल्याने तिघांनाही तातडीने रात्रीच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांना पिता-पुत्राने प्रतिसाद दिला नाही. (Satara News) त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पहाटे हणमंतराव पोतेकर व त्यानंतर १५ मिनिटांनी अमित पोतेकर यांचा करुण अंत झाला.
मन खिन्न करणारी ही घटना फलटण शहरात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Satara News) मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, हणमंतराव यांच्या मुलीची तब्येत सुधारत आहे. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.