सुरेश घाडगे
परंडा : तालुक्यातील ढगपिंपरी ग्रामपंचायतच्या ओबीसी महिला आरक्षित सरपंचपदाच्या निवडणुकीत शुक्रवार ( दि.११ ) एकमेव ओबीसी महिला प्रवर्गातील सदस्या तथा यापुर्वी सरपंचपदाचा राजीनामा दिलेल्या गुंफा मासाळ यांनी सरपंच पदासाठी अर्ज भरलाच नाही. त्याच एकमेव ओबीसी महीला प्रवर्गातील सदस्या असल्याने सरपंच पदाची निवडणुक झाली नाही. निवडणुक पुढे ढकलण्यात आलेली आहे. सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतचे सरपंच पद रिक्तच राहीले आहे .
ढगपिंपरी ग्रामपंचायत येथील सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी शुक्रवार दि ११ रोजी दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालय ढगपिंपरी येथे सभा बोलवण्यात आली होती. परंतू सरपंच पदासाठी कुणीच उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. बप्पाजी काळे, राजेंद्र परबत, रामराजे काकडे, गुंफा मासाळ, चंपावती जाधव, प्रियांका गरड व सिंधू येवारे हे सात सदस्य आहेत. मासाळ वगळता सर्व सदस्य उपस्थित होते. ओबीसी महिला आरक्षित सरपंचपद असल्याने या प्रवर्गातून एकमेव सदस्या असलेल्या गुंफा मासाळ यांची सरपंचपदी वर्णी लागली होती .परंतु त्यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झालेले आहे .
माजी सरपंच गुंफा लहु मासाळ यांनी सोमवारी (दि. २२ ऑगष्ट २०२२ ) सरपंच पदाचा राजीनामा परंडा पंचायत समीती गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला होता. मानसिक त्रासामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले होते. सरपंच मासाळ यांची १३ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंचपदी निवड झाली होती.