Sahyadri Hospital Vandalism: हडपसर, (पुणे) : चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाइकांनी सह्याद्री रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासह साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तोडफोड कोणी केली हे माहीत नसल्याचे अजय सपकाळ यांनी सांगितले. (Pune Crime)

हेही वाचा- तोतया पोलिसांचा सुळसुळाट, दुचाकीवरून जात असलेल्या महिलेचे ५ लाख रुपयांचे दागिने लंपास
हडपसर पोलिसांनी तोडफोड प्रकरणी कुणाल सपकाळ, गौरव सपकाळ, शुभम सपकाळ आणि विश्वजीत कुमावत यांच्यासह सात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने, संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाचे प्रवेशद्वार फोडून साहित्याची तोडफोड केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन, नातेवाईकांशी संपर्क साधला. ‘कायदा हातात घेऊ नका, या घटनेबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल. रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार द्या, तुमची तक्रारही घेतली जाईल’, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, घटनास्थळी अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, डॉ. संदीप भाजीभाकरे, सहाय्यक आयुक्त अनुराधा उदमले यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थिती नियंत्रणात आणली. तोडफोड प्रकरणी कुणाल सपकाळ, गौरव सपकाळ, शुभम सपकाळ आणि विश्वजीत कुमावत यांच्यासह सात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.




