Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर महामार्गाची ‘सुरक्षा’ वाऱ्यावर ; पत्रे गायब, जाळी हटवली, मनमानी दुभाजकांमुळे अपघाताचा धोका वाढला..

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Tuesday, 25 August 2026, 13:10

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असताना महामार्गाच्या सुरक्षेचा मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र यवत परिसरात पाहायला मिळत आहे. महामार्गाच्या कडेला वाहनांना रोखण्यासाठी लावण्यात आलेली लोखंडी सुरक्षा पत्रे (MBCB) अनेक ठिकाणी तुटलेली, गायब झालेली अथवा नागरिकांनी आपल्या सोयीनुसार काढून टाकलेली आहेत. त्यामुळे भरधाव वाहने थेट शेतात, दुकानांमध्ये किंवा वस्तीमध्ये घुसण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने डिसेंबर 2024 पासून नियुक्त कंत्राटदार पुणे सोलापूर एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत सुरक्षा पत्रे बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तब्बल 20 महिने उलटूनही महामार्गावरील अनेक धोकादायक ठिकाणी अद्याप सुरक्षा पत्रे बसविण्यात आलेली नाहीत.

यवत परिसरातील प्रवीण मसाला कंपनीसमोरील सुरक्षा पत्रे अपघातात तुटून जवळपास महिनाभर झाला, तरीही ती अद्याप दुरुस्त अथवा नव्याने बसविण्यात आलेली नाहीत. महामार्गावर वाहनांचा वेग मोठा असल्याने रात्रीच्या वेळी अंधार, वळणे आणि रस्त्याच्या कडेला असलेली असुरक्षितता यामुळे चालकांचे नियंत्रण सुटल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

यवत गावाच्या सुरुवातीला महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सेवा रस्ते सुरू होतात. मात्र, सायंकाळनंतर या ठिकाणी ट्रक, टेम्पो आणि मालवाहतूक वाहने मोठ्या प्रमाणावर महामार्गालगत उभी केली जातात. सोलापूरकडून यवतकडे येणाऱ्या वाहनचालकांना मुख्य मार्गावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे समोरील वाहतूक स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताला खुले आमंत्रण मिळत आहे. या ठिकाणी सुरक्षा पत्रे बसवावीत किंवा महामार्गावर मालवाहतूक वाहनांना पार्किंग करण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

पाच दिवसांपासून जाळी गायब

यवत येथे नागरिकांकडून वारंवार रस्ता ओलांडला जात असल्याने काही दिवसांपूर्वी महामार्गाच्या मध्यभागी सुरक्षेसाठी लोखंडी जाळी बसविण्यात आली होती. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून ही जाळीच गायब झाली आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा थेट महामार्ग ओलांडताना दिसत आहेत. विशेषतः शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची या ठिकाणी मोठी वर्दळ असल्याने जाळी हटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन जाळी पुन्हा बसवावी, अशी मागणी होत आहे.

‘सुरक्षे’च्या नावाखाली नागरिकांची कोंडी; पर्यायी मार्गाची मागणी

महामार्ग ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी जाळी बसविल्यानंतर नागरिकांना अनेकदा जवळपास एक किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. श्री काळभैरवनाथ मंदिराशेजारील मोरी पादचारी वाहतुकीसाठी खुली करून नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

आपल्या सोयीनुसार फोडले दुभाजक; प्रशासनाचे दुर्लक्ष?

महामार्गाच्या काही भागात प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने दुभाजक तयार केले आहेत. मात्र, काही ठिकाणी नागरिक अथवा वाहनचालकांनी आपल्या सोयीनुसार दुभाजक फोडून अनधिकृत मार्ग तयार केल्याचे चित्र आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडून अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्ग प्रशासनाने अशा सर्व अनधिकृत दुभाजकांची तातडीने पाहणी करून ते बंद करावेत. तसेच आवश्यक ठिकाणी अधिकृत यू-टर्न किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का?

पुणे-सोलापूर महामार्ग हा पुणे, दौंड, सोलापूरसह अनेक शहरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, सुरक्षा पत्रे तुटलेली, जाळी गायब, महामार्गावर पार्किंग आणि मनमानी दुभाजक अशी परिस्थिती कायम राहिल्यास एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, महामार्ग प्रशासनाने कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष पाहणी करून तुटलेली सुरक्षा पत्रे तातडीने बसवावीत, गायब झालेली जाळी पुन्हा लावावी, महामार्गालगतचे बेकायदा पार्किंग हटवावे आणि अनधिकृत दुभाजक बंद करावेत, अशी जोरदार मागणी यवत परिसरातील नागरिकांनी केली आहे.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागातील ‘हे’ प्रमुख रस्ते जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद; पोलिसांचा मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 16:04

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! करपलेल्या पिकांचा थेट शेतात जाऊन पंचनामा, सरकारचा मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 16:01

मराठा आरक्षणाच्या लढ्यात अण्णा हजारेंची एंट्री! जरांगेंना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

Thursday, 10 September 2026, 15:42

‘आम्ही तुम्हाला अटक करायला येतोय’ आज्जीबाईंना तो एक फोन आला अन् पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 15:35

गणेश मंडळांनो सावधान! डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा वाढला तर थेट कारवाई; पोलिसांचा कडक इशारा

Thursday, 10 September 2026, 15:09

एसडीएम कार्यालयात क्लर्कची नोकरी लावण्याचे आश्वासन दाखवून तरुणीची सुमारे 10 लाखांची फसवणूक, सासवडच्या तरुणावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:59
Next Post

‘फ्लॅटसाठी 10 लाख आण, नाहीतर माहेरी जा’; लोणी काळभोरमध्ये विवाहितेचा छळ, पतीसह सासू-सासरे व दीराविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp