Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘फ्लॅटसाठी 10 लाख आण, नाहीतर माहेरी जा’; लोणी काळभोरमध्ये विवाहितेचा छळ, पतीसह सासू-सासरे व दीराविरुद्ध गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 25 August 2026, 13:25

लोणी काळभोर : लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने संसार सुरळीत चालल्यानंतर पतीसह सासू-सासरे व दीराने फ्लॅट खरेदीसाठी माहेरून तब्बल 10 लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. पैसे आणण्यास नकार दिल्याने शिवीगाळ, मारहाण व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप कदमवाकवस्ती येथील 23 वर्षीय विवाहितेने केला आहे. पैसे न दिल्यास मुलीला कायमची माहेरी घेऊन जा, असे सांगून घराबाहेर काढल्याचा आरोपही तिने केला आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पती संदेश नवनाथ वारे, सासू निर्मला नवनाथ वारे, सासरे नवनाथ वारे आणि दीर संकेत नवनाथ वारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 115(2),352,85 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता यांचा विवाह 2 मे 2024 रोजी संदेश नवनाथ वारे यांच्याशी हिंदू रितीरिवाजानुसार उरुळी कांचन येथील अलंकार मंगल कार्यालयात झाला. लग्नावेळी माहेरच्या मंडळींनी सोन्याचे दागिने, संसारोपयोगी साहित्य तसेच लग्नाचा संपूर्ण खर्च केला होता. लग्नानंतर सुरुवातीचे पाच-सहा महिने संसार सुरळीत होता. मात्र, त्यानंतर सासू निर्मला वारे या पाहुण्यांसमोर अपमानास्पद बोलून मानसिक त्रास देऊ लागल्या. तसेच, माहेरच्यांनी लग्नात अपेक्षेप्रमाणे मानपान केला नाही, अशी कारणे सांगून वडिलांना शिवीगाळ केली जात असल्याचेही तक्रारदार महिलेने नमूद केले आहे.

गर्भवती असतानाही जड कामे करण्यास लावली.

 

डिसेंबर 2025 मध्ये आपण गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. जड काम करू नये, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला होता. ही माहिती पतीने सासूला दिल्यानंतरही सासूने ड्रममध्ये पाणी भरण्यासह जड कामे करण्यास सांगितल्याचा आरोप पीडिता यांनी केला आहे. ड्रममध्ये पाणी भरत असताना अचानक त्रास होऊन रक्तस्राव सुरू झाला. मात्र, त्यानंतरही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

‘10लाख रुपये घेऊन ये’ असा तगादा

यानंतर पती व सासूने ‘तुझ्या आई-वडिलांनी आमच्या मनासारखे काही दिले नाही’, असे म्हणत नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 10 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पैसे आणण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर पतीने शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच दीरानेही मारण्यासाठी अंगावर धावून येत पैशांची मागणी केल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.

माहेरच्यांसमोर घराबाहेर काढले

22 जुलै 2026 रोजी पती संदेश वारे यांनी तक्रारदार महिलेच्या वडिलांना फोन करून घरी बोलावले. त्यानंतर तिचे वडील, आई, आत्या आणि मामा घरी गेले असता सासूने त्यांच्याकडे पुन्हा 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसे देणार नसाल तर मुलीला कायमची माहेरी घेऊन जा, असे सांगून तिला घराबाहेर काढल्याचा आरोप आहे. तसेच, तिचे सोन्याचे दागिने, साड्या व इतर संसारोपयोगी साहित्य सासरच्यांनी ताब्यात ठेवले असून, ‘माहेरून 10 लाख रुपये घेऊन ये, त्यानंतरच सासरी नांदायला ये’, असे सांगून माहेरी पाठविल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे 2 मे 2024 पासून 22 जुलै 2026 पर्यंत पती, सासू-सासरे आणि दीर यांनी शारीरिक व मानसिक छळ करून पैशांची मागणी केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लोणी काळभोर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

9 सप्टेंबरला लक्ष्मीची कृपा! ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीतही मिळू शकते गुड न्यूज

Wednesday, 9 September 2026, 7:53

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड; एपीआय (API) कृष्णा बाबर लाच स्वीकारताना अडकले जाळ्यात

Wednesday, 9 September 2026, 7:36

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19
Next Post

पुण्यात 26 ऑगस्टला वाहतुकीचा ‘रूट’ बदलणार! ईद-ए-मिलाद मिरवणुकीमुळे 'हे' मार्ग बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp