युनुस तांबोळी
Robbery at Pimperkhed शिरूर : पिंपरखेड ( ता. शिरूर ) येथील दाभाडेमळा येथे गुरूवार ( ता. १८ ) पहाटे च्या सुमारास दोन ठिकाणी जबरी चोरीचा प्रकार घडला. चोरट्यांनी कोयता, गलोल व दांडक्याचा धाक दाखवित सोन्या चांदिच्या दागिन्यांसह सुमारे पाऊने सहा लाख रूपयांचा ऐवज लंपास केला. यात महिलांना देखील मारहाण केल्याचीही माहिती सहाय्य्क पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी दिली. या बाबत प्रवीण बाळू दाभाडे यांनी फिर्याद दिली आहे. (Robbery at Pimperkhed, gold and silver jewelery looted)
महिलांना मारहाण; दागिने लुटले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार अज्ञात चोरट्यांनी प्रदिप दाभाडे यांच्या घराचा दरवाजा पहाटेच्या दरम्यान जोरात ढकलून उघडला. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला. (Robbery at Pimperkhed)चोरट्यांच्या आवाजाने दाभाडे पती पत्नी जागे झाले. चोरट्यांनी त्यांना कोयता व गलोल चा धाक दाखवला. त्यानंतर पूजा दाभाडे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. कटावणीने कपाटाचे लॅाकर तोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम असा पाच लाख साठ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत केला.
प्रदिप दाभाडे यांच्या खोलिशेजारी एका खोलीत त्यांचे भाऊ राहूल दाभाडे, आतेभाऊ निलेश डुकरे, भावजय अनुजा दाभाडे हे तर दुसऱ्या खोलित त्यांचे वडील बाळू दाभाडे, आई अरूणा दाभाडे हे झोपले होते.(Robbery at Pimperkhed) चोरट्यांचा आवाज ऐकून ते जागे झाले. व मदतीसाठी त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या खोल्यांना बाहेरून कड्या लावलेल्या होत्या. त्यांच्या मदतीच्या आरडा ओरड्याने चोरट्यांनी त्यांच्या खोल्यांवर दगड फेकले.
दरम्यान, त्याचवेळी गोठ्यात झोपलेल्या प्रदिप यांच्या आजी शांताबाई नावजी दाभाडे यांना चोरट्यांनी हाताने मारहाण करीत त्यांच्या अंगावरील दागीने काढून घेतले. (Robbery at Pimperkhed) जाताना चोरट्यांनी प्रदिप यांच्या घराजवळील एका घरालाही लक्ष केले. तेथे अंजनाबाई धोंडीबा दाभाडे यांना मारहाण करून त्यांच्या घरातील कपाटातून रोख रक्कम व कर्णफुले असा १७ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.
साधारण चोरटे हे २५ ते ३० वयोगटातील असून काळ्या रंगाची पॅन्ट आणि टी शर्ट घातलेले होते. अशी माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस हवालदार विशाल पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Robbery at Pimperkhed) घटनास्थळी सापडेल्या वस्तू व ठसे तज्ञाकडून ठसे प्राप्त केले आहे. श्वानपथक चोरट्यांचा शोध घेत आहे.
पिंपरखेड येथील बॅक ऑफ महाराष्ट्र वर पडलेला दरोडा व या घटनेची उकल करण्यात पोलिस खाते यशस्वी झाले होते. (Robbery at Pimperkhed)नंतर पुन्हा या भागात झालेली ही जबरी चोरीचा छडा लावणे पोलिस खात्याला मोठी कामगिरी जिकीरीची होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Suicide | शिरुरमध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट…