Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवडच्या नामांकित हॉटेलचा भांडाफोड! पावभाजीत अळी; FDAची तातडीची कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 4 August 2026, 21:58

पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ठिकठिकाणी कारवाईचा धडाका सुरू आहे.अशातच आता पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात असलेल्या प्रसिद्ध सावजी (सावली) हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,प्रसिद्ध सावजी (सावली) हॉटेलमध्ये,ऑनलाईन ऑर्डर केलेल्या पावभाजीमध्ये एका ग्राहकाला चक्क जिवंत अळी सापडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.’फ्रेंडशिप डे’निमित्त निगडीतील हॉटेल्समध्ये खवय्यांची मोठी गर्दी होती. एका ग्राहकाने मागवलेल्या पावभाजीचे चार ते पाच घास खाल्ल्यानंतर त्यात जिवंत अळी असल्याचे अचानक निदर्शनास आले. हा किळसवाणा प्रकार पाहताच उपस्थितांनी हॉटेलमधील अस्वच्छतेविरोधात जोरदार आवाज उठवला.

दुसरीकडे, ही अळी थेट पावभाजीत नसून सोबत दिलेल्या सलाडमध्ये असावी, असा बचाव हॉटेल व्यवस्थापनाकडून मांडण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास 2000 हॉटेल्स असून त्यांच्या अन्नाची गुणवत्ता तपासणे हे प्रशासनाचे काम आहे. मात्र, योग्य पाहणी होत नसल्यामुळेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे.

या घटनेनंतर संबंधित ग्राहकाने तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे फोनवरून तक्रार नोंदवली. या तक्रारीची गंभीर दखल घेत एफडीएने प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकारामुळे शहरातील हॉटेलमधील स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या दर्जावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC उमेदवारांना दिलासा! गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ; 5,707 पदांसाठी आणखी संधी

Wednesday, 5 August 2026, 23:03

मंत्रिपद जाणार? संजय शिरसाटांसह आणखी 3 मंत्र्यांवर टांगती तलवार,नेमकं काय प्रकरण?

Wednesday, 5 August 2026, 22:44

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा भडकला! 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध,राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 21:38

तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परती प्रवासात यवतकरांचा भक्तीभाव! वारकऱ्यांसाठी चपाती-भाजीचा नेवैद्य

Wednesday, 5 August 2026, 21:18

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला वेग! अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन,राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 21:06

15 ऑगस्टला शाळांमध्ये कवायत संचलन! विद्यार्थ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आदेश,दुमदुमणार देशभक्तीचा जयघोष

Wednesday, 5 August 2026, 20:37
Next Post

वाकड पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल १५.५० लाखांच्या २५ दुचाकी जप्त; १७ गुन्हे उघडकीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.