Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाकड पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल १५.५० लाखांच्या २५ दुचाकी जप्त; १७ गुन्हे उघडकीस

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 4 August 2026, 22:13

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील वाहनचोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्याच्या मोहिमेत वाकड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. वाहनचोरी करणाऱ्या तीन संशयितांना अटक करत पोलिसांनी तब्बल १५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २५ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे पुणे आणि रायगड जिल्ह्यातील एकूण १७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, एका आरोपीने केवळ मौजमजेसाठी वाहने चोरत असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्ञानेश्वर शंकरराव जैसवाल (वय ४६, रा. आळंदी देवाची), वेदप्रकाश मदनसिंग रावत (वय ३५, रा. ताथवडे) आणि संतोष मोहन मांगिलवाड (वय २८, रा. वाकड) यांचा समावेश आहे.

पोलिस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरीच्या विविध गुन्ह्यांचा तपास करताना वाकड पोलिसांच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. या तपासादरम्यान १ ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वर जैसवाल याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याच्याकडून तब्बल २३ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.

यानंतर दुसऱ्या प्रकरणात २ ऑगस्ट रोजी वेदप्रकाश रावत याला अटक करून त्याच्याकडून एक चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच संतोष मांगिलवाड यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून आणखी एक चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. अशाप्रकारे तिन्ही आरोपींकडून एकूण २५ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

 

तपासादरम्यान ज्ञानेश्वर जैसवाल हा खासगी वाहनांवर बदली चालक म्हणून काम करत असल्याचे समोर आले. तो मौजमजेसाठी दुचाकी चोरत असे आणि वापरून झाल्यानंतर त्या विविध ठिकाणी बेवारस अवस्थेत सोडून देत असल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईमुळे वाकड, आळंदी, चाकण, देहूरोड, तळेगाव दाभाडे, संत तुकारामनगर, सिंहगड तसेच रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आठ दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध अद्याप सुरू आहे.

दरम्यान, चोरीची वाहने खरेदी-विक्री करणारे तसेच वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व्यक्तींचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त प्रदीप जाधव, सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे आणि त्यांच्या तपास पथकाने केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आजोबांची जमीन, वडिलांची संपत्ती… तरीही हक्क सांगता येणार नाही? हायकोर्टाचा निर्णय चर्चेत

Wednesday, 5 August 2026, 9:22

आता प्रत्येक UPI पेमेंटवर पैसे मोजावे लागणार? केंद्राच्या नव्या विधेयकाने वाढवली चिंता

Wednesday, 5 August 2026, 9:02

नंबर प्लेट नाही, पुण्याची ओळख आहे! ‘MH 12’ कायम ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 8:48

‘नकली पनीर’वर 1 वर्षाची बंदी; आता फक्त दुधापासून बनवलेले पनीरच विकता येणार; FDA चा मोठा सर्जिकल स्ट्राइक

Wednesday, 5 August 2026, 8:37

पुढचे काही तास महत्त्वाचे! महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या कसे असेल आजचे हवामान

Wednesday, 5 August 2026, 8:17

Daily Horoscope: बुधवार महायोग तुमचं आयुष्य बदलू शकतो! तुमच्या राशीत काय लिहिलंय, आत्ताच वाचा

Wednesday, 5 August 2026, 7:34
Next Post

मद्यप्रेमींना मोठा धक्का! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर सरकारची बंदी; जाणून घ्या नेमकं कारण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.