Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नंबर प्लेट नाही, पुण्याची ओळख आहे! ‘MH 12’ कायम ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 5 August 2026, 8:48

पुणे : पुणे शहर म्हटलं की अनेकांच्या मनात सर्वात आधी येणारी ओळख म्हणजे ‘MH 12’ हा वाहन नोंदणी क्रमांक. मात्र वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ही मालिका संपण्याच्या मार्गावर आली होती. त्यामुळे पुण्याचा आरटीओ कोड बदलला जाणार का, याबाबत शहरात चिंता निर्माण झाली होती. आता या विषयावर सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवीन वाहनांची नोंदणी होते. वाढत्या वाहनसंख्येमुळे ‘MH 12’ अंतर्गत उपलब्ध असलेल्या नंबर प्लेटच्या मालिका कमी पडत आहेत. त्यामुळे नवीन क्रमांक प्रणाली लागू करण्याचा विचार सुरू होता. यामुळे पुणेकरांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या, कारण ‘MH 12’ ही केवळ नंबर प्लेट नसून शहराची एक वेगळी ओळख मानली जाते.

सध्या पुणे आरटीओकडून दुचाकी वाहनांसाठी ‘ZY’ आणि चारचाकी वाहनांसाठी ‘ZW’ ही मालिका वापरली जात आहे. पुढे ‘ZZ’ ही मालिका पूर्ण झाल्यानंतर दोन अक्षरांच्या सध्याच्या पर्यायांचा शेवट होणार आहे. त्यामुळे नवीन पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली होती.

या प्रकरणी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणेकरांची भावना मांडली. ‘MH 12’ हा कोड कोणत्याही परिस्थितीत बदलू नये आणि याच ओळखीअंतर्गत पुढील नंबर मालिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

नितीन गडकरी यांनी या मागणीला अनुकूल प्रतिसाद दिला आहे. पुणेकरांसाठी ‘MH 12’चे असलेले महत्त्व लक्षात घेऊन ही ओळख कायम ठेवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला असून, भविष्यातही वाहनांवर ‘MH 12’ ही पुण्याची खास ओळख कायम राहण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“पैसे काढ नाहीतर संपवून टाकीन!” कोयता घेऊन दुकानात घुसला अन् दुकानदाराला धमकावले, उरुळी कांचन पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; पहा व्हिडीओ

Wednesday, 5 August 2026, 11:28

Pune News: कोर्टात हजेरी की मौजमजा? आरोपींच्या मोकळीकीला ब्रेक; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 11:13

पाणी नाही, सुविधा नाही… मग कर कशासाठी? भोरच्या स्वप्नलोक सोसायटीतील नागरिकांचा संताप

Wednesday, 5 August 2026, 10:42

पुराच्या रौद्ररूपाने हिरावला जीव! मुळा-मुठा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह अखेर दौंड तालुक्यात सापडला…

Wednesday, 5 August 2026, 10:32

‘जनतेची कामं करा, नाहीतर पदावरून हटवू’; मंत्र्यांना शिंदेंचा अल्टिमेटम

Wednesday, 5 August 2026, 10:18

आजोबांची जमीन, वडिलांची संपत्ती… तरीही हक्क सांगता येणार नाही? हायकोर्टाचा निर्णय चर्चेत

Wednesday, 5 August 2026, 9:22
Next Post

आता प्रत्येक UPI पेमेंटवर पैसे मोजावे लागणार? केंद्राच्या नव्या विधेयकाने वाढवली चिंता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.