पुणे : महिला व बालविकास विभागात नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. महिला व बालविकास विभागातील नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.अध्यक्ष आणि सदस्य या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२५ आहे. यानंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
महिला व बालविकास विभागात एकूण १४ जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. पुणे या ठिकाणी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत अर्ज करायचे आहेत. या नोकरीबाबत सविस्तर माहितीhttp://www.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित महिला व बालविकास अधिकाऱ्यांसाठी संपर्क साधू शकता.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्ज आयुक्त कार्यालय, महिला व बालविकास आयुक्तालय, २८-राणीची बाग, जुन्या सर्किट हाउसजवळ, महाराष्ट्र, पुणे-१ येथे पाठवायचा आहे. यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे.