Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागच कारण गुलदस्त्यात?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 12 August 2026, 10:26

पुणे : महाराष्ट्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांचा ताफा सकाळी ८ च्या सुमारास वर्षा बंगल्याकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे.

ही भेट जरी अचानक वाटत असली तरी मिळालेल्या माहितीनुसार ती दोन दिवसांपूर्वीच पूर्वनियोजित होती. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे केंद्र आणि राज्य सरकारसह भाजप नेत्यांवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करत आहेत. नुकत्याच झालेल्या मेळाव्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधला होता. याशिवाय मुंबई-गोवा महामार्गाची स्वतः पाहणी केल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले होते.

तसेच, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात जवळीक वाढल्यापासून राज ठाकरेंची सरकारविरोधी भूमिका अधिक आक्रमक झाली आहे. अशा तणावपूर्ण राजकीय वातावरणात ही भेट झाल्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.मात्र, या भेटीमागे राजकीय कारणांसोबतच इतर काही प्रमुख मुद्दे असल्याची चर्चा आहे.

दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क जिमखान्याशी संबंधित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे . या वेळी राज ठाकरे यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक हेदेखील उपस्थित होते. याशिवाय, नुकत्याच केलेल्या पाहणीच्या आधारे राज ठाकरे मुंबई-गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामावरही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

सततच्या टीकेनंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कोणतीही टोकाची प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आता या प्रदीर्घ चर्चेनंतर राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

वैताग आणला तुम्ही! दारूसाठी जमीन विकली, आता अजून पैसे मागताय? म्हणत पत्नीने आवळला गळा अन् मुलाने सायकलचा पंप डोक्यात घालून संपवले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp