पुणे पर्यटन : पावसाळ्यात निसर्गाची मजा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक बाहेर पडतात आणि त्यात सुट्टया असतील तर अनेकजण आपल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घटाच्या दिशेने वळतात. अशातच बकरी ईद आणि विकेंडची सुट्टी सलग आल्याने बरेच पुणेकर फिरायला बाहेर पडले आहेत.

सलग तीन दिवस सुट्टी अन् मोठ्या प्रमाणात पर्यटक बाहेर पडल्याने वाहनांच्या मोठ्याच-मोठ्या रांगा लागल्या आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच जुन्नर, नाणेघाट, भिमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.

सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याने पर्यटक वैगातले आहेत. गाड्या एकाच जागी थांबल्याने सुट्टीचा आनंद घ्यायला जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, सकाळपासून वाहनांचा प्रश्न न सुटल्याने वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच सुट्ट्यांच्या दिवसात प्रशासनाच्या नियोजनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
‘या’ महामार्गावर वाहतूक ठप्प
पुणे-नाशिक, जुन्नर, नाणेघाट, भिमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी महामार्ग ठप्प झाला आहे. अशातच जर तुम्ही देखील रविवारी याठिकणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला देखील ट्राफिक जामचा सामना करावा लागू शकतो.







