Sunday, May 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune ZP News : जिल्हा परिषद शाळांमध्ये आता ‘शिपाई’ मिळणार?  ग्रामीण शाळांच्या व्यवस्थापनात होणार मोठा बदल

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 10 May 2026, 11:16

Pune ZP News पुणे, ता. १० : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छता, दैनंदिन व्यवस्थापन आणि पूरक कामकाजाच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिपाई पदाची आवश्यकता तपासून तातडीने कार्यवाही करावे. असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Pune ZP News

पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण भवन, कॅम्प येथून जारी करण्यात आलेल्या या आदेशात शाळांमधील दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी शिपाई पद आवश्यक असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. Pune ZP News

 

दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळा परिसराची देखभाल, घंटा वाजवणे, कार्यालयीन सहाय्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी कामे आणि इतर पूरक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नसल्याने शिक्षकांनाच ही अतिरिक्त कामे करावी लागत आहेत. त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. Pune ZP News

ग्रामपंचायतींना काय करावे लागणार?
जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, त्यांच्या हद्दीतील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून शिपाई पदाची गरज तपासावी. यासाठी शिक्षण विभागाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांची संख्या, शाळेचे कामकाज, उपलब्ध कर्मचारी आणि स्थानिक गरजा लक्षात घ्याव्यात.तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती, निधीची उपलब्धता आणि संबंधित कायदेशीर तरतुदी विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ६१ तसेच शासन निर्णयानुसार कार्यवाही करणे बंधनकारक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

शिक्षकांवरील ताण कमी होणार?
ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिपाई नसल्याने शिक्षकांनाच स्वच्छतेपासून ते प्रशासकीय कामांपर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. परिणामी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अध्यापनावर परिणाम होत असल्याचे चित्र होते.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेला निर्णय शिक्षकांसाठी दिलासादायक मानला जात आहे. शाळांमध्ये शिपाई नियुक्त झाल्यास शिक्षकांना केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करता येणार असून, विद्यार्थ्यांनाही अधिक स्वच्छ आणि शिस्तबद्ध वातावरण मिळणार आहे.

ग्रामपंचायत स्तरावर वाढणार जबाबदारी
या आदेशामुळे ग्रामपंचायतींची शिक्षण व्यवस्थेतील भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक स्तरावर शाळांच्या गरजा ओळखून निर्णय घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर येणार असून, शिक्षण व्यवस्थापनातील उत्तरदायित्व अधिक स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.सदर आदेश गजानन पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले असून, जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी याबाबत लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pimpri Crime : ‘पाण्याची टाकी दाखवतो’ म्हणत 4 चिमुरड्यांना नेलं टेरेसवर, वॉचमन अटकेत

Sunday, 10 May 2026, 14:51
Maharashtra SSC and HSC Supplementary exams from June 24

SSC RESULT : राज्यात मराठी विषयात ९४ हजारांहून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण

Sunday, 10 May 2026, 14:40

Pune Murder Case : नांदेड सिटीतील सुनेच्या हत्येप्रकरणी फरार सासरा जेरबंद

Sunday, 10 May 2026, 14:35

Hadapsar Sex Racket : मसाज सेंटरच्या आड सुरू होता देहव्यापार; पोलिसांकडून ५ तरुणींची सुटका

Sunday, 10 May 2026, 13:16
Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदू खरात प्रकरणाने राजकारण तापलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट, “चार मंत्र्यांचा थेट संबंध”

Sunday, 10 May 2026, 13:00

SSC Result : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेचा दहावीचा 100 टक्के निकाल ; उत्कृष्ट निकालाची दहा वर्षाची परंपरा यंदाही कायम..

Sunday, 10 May 2026, 12:50
Next Post

Big News : लोणी काळभोरला बुलेट ट्रेनचे ‘मोठे स्टेशन’होणार? पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या आराखड्याला गती?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.