Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ashok Kharat : भोंदू खरात प्रकरणाने राजकारण तापलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट, “चार मंत्र्यांचा थेट संबंध”

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 10 May 2026, 13:00
Ashok Kharat

photo- social media

Ashok Kharat पुणे, ता. १० : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंधश्रद्धेच्या आड महिलांचा लैंगिक छळ आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अशोक खरात प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांचा थेट सहभाग असल्याचा दावा पटोलेंनी केला आहे. Ashok Kharat

या प्रकरणात समोर आलेल्या धक्कादायक व्हिडिओंमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती. वाढत्या दबावानंतर राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. मात्र तपास सुरू असतानाच नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

 

पटोले म्हणाले, “अशोक खरातकडून महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीती आम्ही आधीपासून व्यक्त करत आहोत. विधानसभेतही हा मुद्दा मांडला होता. या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्री सामील असल्याची माहिती आमच्याकडे आहे. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असून संबंधित मंत्र्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी करणार आहोत.” Ashok Kharat

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही पटोलेंनी जोरदार टीका केली. “राज्यात गुंड, भोंदू बाबा आणि फसवणूक करणाऱ्यांचे फावले आहे. भीतीचं वातावरण उरलेलं नसल्याने अशा घटना सातत्याने घडत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचाही उल्लेख करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. Ashok Kharat

दरम्यान, “ते चार मंत्री कोण?” याची राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशोक खरातने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत अनेक महिलांना जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. काही महिलांनी पुढे येत त्याच्यावर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले. Ashok Kharat

याचबरोबर काही व्यावसायिकांनीही खरातकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करत तक्रारी दाखल केल्या आहेत. या वादात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नावही चर्चेत आले. विरोधकांकडून वाढलेल्या दबावानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. Ashok Kharat

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

Hadapsar Sex Racket : मसाज सेंटरच्या आड सुरू होता देहव्यापार; पोलिसांकडून ५ तरुणींची सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.