Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 2 July 2026, 18:35

जामखेड, ता. 2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी असलेल्या जामखेड तालुक्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार २०२६’ वितरण प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप पुढे आला आहे. या प्रकरणी *’श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक महोत्सव समिती’*चे सदस्य पांडुरंग माने आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन राऊत यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आनंद भंडारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. याची गंभीर दखल घेत सीईओंनी चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

निवेदनानुसार, दरवर्षी ३१ मे रोजी प्रदान करण्यात येणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जामखेड तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींपैकी केवळ दोन ते चार ग्रामपंचायतींमध्येच वितरित करण्यात आला. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये पुरस्कार वितरणच झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही याच प्रकारे पुरस्कार वितरणात टाळाटाळ करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात पाटोदा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत सातपुते यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कर्तृत्ववान महिला पुरस्काराऐवजी महिलांना वेगळाच पुरस्कार देऊन तोच अधिकृत पुरस्कार असल्याचे सांगत दिशाभूल केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध असल्याचे सांगत ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, तालुक्यातील अशा प्रकारच्या गैरप्रकारांना अभय देत असल्याचा आरोप करत जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनासह उपोषण करण्याचा इशाराही पांडुरंग माने आणि नितीन राऊत यांनी दिला आहे.

 

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाशी संबंधित पुरस्कार वितरणात झाल्याचा आरोप असलेल्या या प्रकारामुळे जामखेड तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, आता प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp