Sunday, May 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SSC RESULT : राज्यात मराठी विषयात ९४ हजारांहून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 10 May 2026, 14:40
Maharashtra SSC and HSC Supplementary exams from June 24

पुणे, ता. १० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असली, तरी मराठी भाषेबाबत समोर आलेली आकडेवारी शिक्षण क्षेत्रासाठी चिंतेची घंटा ठरत आहे. राज्यभरात तब्बल ९४ हजारांहून अधिक विद्यार्थी मराठी विषयात अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षणतज्ज्ञ, पालक आणि भाषा अभ्यासकांमध्ये गंभीर चर्चा सुरू झाली आहे. SSC RESULT

यंदाच्या एसएससी परीक्षेसाठी मराठी प्रथम भाषा विषयात १० लाख ९८ हजार ६२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १० लाख ६ हजार ८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९२.५७ इतकी नोंदवली गेली. मात्र, तब्बल ८० हजार ८०३ विद्यार्थी मराठी प्रथम भाषेत नापास झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा असलेल्या मराठी विषयात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अपयशी ठरणे ही गंभीर बाब मानली जात आहे. SSC RESULT

 

याशिवाय मराठी विषयाची द्वितीय किंवा तृतीय भाषा म्हणून निवड केलेल्या ४ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ७४१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे सर्व श्रेणी मिळून जवळपास ९४ हजार ५४४ विद्यार्थ्यांना मराठी विषयात अपयश आले आहे. SSC RESULT

शिक्षणतज्ज्ञांच्या मते, हा केवळ अभ्यासातील कमकुवतपणाचा प्रश्न नसून बदलत्या सामाजिक आणि भाषिक वातावरणाचे संकेत आहेत. शहरीकरण, इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण आणि घराघरात इंग्रजी-हिंदीचा वाढता वापर यामुळे विद्यार्थ्यांचा मराठी भाषेशी असलेला दैनंदिन संपर्क कमी होत चालल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’चा दर्जा दिल्यानंतर हा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. मातृभाषेचे संवर्धन, प्रादेशिक भाषांचे जतन आणि इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामध्ये संतुलन राखण्याचे मोठे आव्हान शिक्षण व्यवस्थेसमोर उभे ठाकले आहे. SSC RESULT

काही शिक्षकांच्या मते, विज्ञान आणि गणितासारख्या विषयांच्या तुलनेत भाषा विषयांना कमी महत्त्व दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची तयारीही अपुरी राहते. तर काही शिक्षणतज्ज्ञ भाषा शिकवण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. “भाषा शिक्षण अधिक परीक्षाभिमुख झाले असून साहित्य, संस्कृती आणि संवादाशी असलेली त्याची नाळ कमकुवत होत आहे,” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. SSC RESULT

मराठी भाषेच्या भवितव्याबाबत चिंता वाढत असताना, विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढवणे, शाळांमधील अध्यापन पद्धती बदलणे आणि घराघरात मराठीचा वापर वाढवणे आवश्यक असल्याचे मत आता जोर धरू लागले आहे. SSC RESULT

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pimpri Crime : ‘पाण्याची टाकी दाखवतो’ म्हणत 4 चिमुरड्यांना नेलं टेरेसवर, वॉचमन अटकेत

Sunday, 10 May 2026, 14:51
Maharashtra SSC and HSC Supplementary exams from June 24

SSC RESULT : राज्यात मराठी विषयात ९४ हजारांहून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण

Sunday, 10 May 2026, 14:40

Pune Murder Case : नांदेड सिटीतील सुनेच्या हत्येप्रकरणी फरार सासरा जेरबंद

Sunday, 10 May 2026, 14:35

Hadapsar Sex Racket : मसाज सेंटरच्या आड सुरू होता देहव्यापार; पोलिसांकडून ५ तरुणींची सुटका

Sunday, 10 May 2026, 13:16
Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदू खरात प्रकरणाने राजकारण तापलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट, “चार मंत्र्यांचा थेट संबंध”

Sunday, 10 May 2026, 13:00

SSC Result : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेचा दहावीचा 100 टक्के निकाल ; उत्कृष्ट निकालाची दहा वर्षाची परंपरा यंदाही कायम..

Sunday, 10 May 2026, 12:50
Next Post

Pimpri Crime : ‘पाण्याची टाकी दाखवतो’ म्हणत 4 चिमुरड्यांना नेलं टेरेसवर, वॉचमन अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.