पुणे : पुणे पोलिसांसाठी एक महत्वाची बातमी आहे. वाहतूक पोलिसांना आता कामावर हजेरी लावायची असेल, तर त्यांना आगोदर सेल्फी काढावी लागेल. काम सुरु करण्या आगोदर आणि काम संपवताना त्यांना सेल्फी काढून तो अपलोड करवा लागणार आहे. कामावर हजर झाल्याचा पुरावा म्हणून आधी सेल्फी काढावी लागणार आहे. शनिवार ( ता. २९) पुणे शहरातील वाहतूक पोलिसांसाठी हा नवा नियम जारी करण्यात आला आहे. हा अजब नियम सध्या पुण्यातील पोलिसांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
नव्या यंत्रणेनुसार, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना ८.३० ते ९ वाजम्याच्या दरम्यान सेल्फी काढून आपण कामावर हजर झालेलो आहोत, हे दाखवावे लागेल. त्यानंतर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळीही असेच करावे लागणार आहे. तर, काम संपले असतना देखील त्यांना हीच पद्धत करावी लागणार आहे. असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीमाने यांनी सागितले की, ड्युटी साईन इन आणि ड्युटी साईन ऑफ करण्याची ही नवी पद्धत टिपीकल पुणे स्टाईलची असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. विभागीय कार्यलयाला रिपोर्ट करण्याऐवजी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट ट्रॅफिक जंक्शनवर जाऊन रिपोर्ट करावे. त्यासाठी त्यांना हजेरी लावताना अडचण येऊ नये म्हणून हा नवा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे वेळ वाचेल आणि जास्त काम होईल, असा आम्हाला विश्वास वाटत आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांसाठी एक मोबाईल एप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या एप्लिकेशनच्या माध्यमातून फोटो अपलोड करावा लागणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक तोडरमळ यांनी दिली आहे. प्रत्येक तासाला एक सेल्फी अपलोड करुन रिपोर्टींग करावे लागेल, असंही त्यांनी सागितले आहे.