Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune SSC Paper Leak: पुण्यात गणिताचा पेपर 3 दिवस आधीच कसा काय लीक झाला? शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा प्रकार उघड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 11 March 2026, 17:54

पुणे: राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि (Pune SSC Paper Leak) तणावमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाच पुण्यात दहावीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेचा प्रकार समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नागपुरातील पेपरफुटी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच पुण्यातही गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक झाल्याची बाब उघड झाल्याने परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दहावीच्या गणित विषयाच्या भाग-1 आणि भाग-2 या दोन्ही प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गणित भाग-2 ची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्याच्या तब्बल 3 दिवस आधीच या ग्रुपवर टाकण्यात आल्याचे तपासात आढळले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संबंधित प्रश्नपत्रिकांची अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केली असता दोन्ही पेपर तंतोतंत जुळत असल्याचे स्पष्ट झाले.

या गंभीर प्रकारानंतर पुणे विभागीय शिक्षण मंडळाने तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टेलिग्राम ग्रुपचा अॅडमिन आणि त्यातील काही सदस्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा आणि संबंधित ग्रुपचा तांत्रिक मागोवा घेतला जात आहे.

पुणे हे राज्यातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र मानले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच सोशल मीडियावर प्रसारित झाल्याची घटना समोर आल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षा प्रक्रियेची गोपनीयता आणि विश्वासार्हता टिकवणे हे शिक्षण मंडळासाठी मोठे आव्हान ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, प्रश्नपत्रिका नेमकी कुठून आणि कशी लीक झाली, त्यामागे कोणते जाळे कार्यरत आहे आणि यात कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधून काढणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलणे हे तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही”

Sunday, 3 May 2026, 13:42

Pune Nasrapur Case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भावनिक विनंती”

Sunday, 3 May 2026, 13:15
Man murdered his wife and daughter in pune

Pune Crime News : धायरीत कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून सुनेचा खून ; आरोपी फरार”

Sunday, 3 May 2026, 13:04

Delhi Judge Suicide : ‘पप्पा, जगणं अवघड झालंय…’ फोननंतर काही तासांतच न्यायाधीशाची आत्महत्या; वैवाहिक वादाचा संशय”

Sunday, 3 May 2026, 12:16

Pune News : हिंजवडीत सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीशी गैरवर्तन, आरोपी अटकेत

Sunday, 3 May 2026, 12:09
Next Post

Loni Kalbhor News: कर्तव्यातील गंभीर हलगर्जीपणाचा फटका! लोणी काळभोरचे ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब वनवे निलंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.