Pune-Solapur Highway : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ‘मांगूर’ जातीच्या माशांची बेकायदेशीर वाहतूक करून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भिवंडी येथील चालकाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune-Solapur Highway
सोरतापवाडी, (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील म्हसोबा मंदीरासमोर शनिवारी (ता.16) संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली आहे. मानवी आरोग्यास आणि पर्यावरणास अत्यंत घातक ठरणाऱ्या या माशांची वाहतूक करून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. Pune-Solapur Highway
अरषदअली महम्मदअली शेख, वय 30, रा. एच.नं. 677 संघमित्र नगर, जी. एम. हॉस्पीटल षेजारी, भिवंडी, ठाणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई तात्याराम करे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Pune-Solapur Highway
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी गावच्या हद्दीतील म्हसोबा मंदिरासमोर उरुळी कांचन पोलिसांचे पथक गस्तीवर होते. यादरम्यान संशयास्पद वाटलेली एक महिंद्रा पिकअप गाडी (क्र. MH 04 LQ 7657) पोलिसांनी रोखली. गाडीची झडती घेतली असता, त्यामध्ये बंदी असलेल्या मांगूर जातीच्या माशांचा मोठा साठा बेकायदेशीररित्या वाहून नेला जात असल्याचे उघडकीस आले. Pune-Solapur Highway
‘थाई मांगूर’ या माशांच्या प्रजननावर आणि विक्रीवर भारतात पूर्णपणे बंदी आहे. हे मासे अत्यंत दूषित पाण्यातही जिवंत राहतात आणि त्यांच्या सेवनाने मानवी शरीराला कर्करोगासारखे (कॅन्सर) गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते. हे मासे खाल्ल्याने लोकांना गंभीर दुखापत व आजार होऊ शकतात, याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपी केवळ नफा कमावण्यासाठी या विषारी माशांची वाहतूक करत होता. Pune-Solapur Highway
याप्रकरणी पोलिसांनी पिकअप चालक अरशदअली शेख याला ताब्यात घेतले आहे. पोलीस शिपाई तात्याराम करे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गु. रजि. नंबर १२१/२०२६ अंतर्गत कलम १५, ३, ५, कलम ५९ कलम २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत. Pune-Solapur Highway







