Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Prime News : साप्ताहिक ‘पुणे प्राईम न्यूज’ आजपासून दैनिक

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Saturday, 22 July 2023, 6:07

Pune Prime News : साप्ताहिक ‘पुणे प्राईम न्यूज’ आजपासून दैनिक

महोदय,
जनतेच्या समस्यांना वाचा फोडावी, विधायक कामे लोकांसमोर आणावीत, सरकारी धोरणे तळागाळापर्यंत पोचली पाहिजेत, राज्यभर घडणाऱ्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक घडामोडी ज्ञात व्हाव्यात या हेतूने दर्जेदार आणि विश्वासार्ह बातम्यांनी परिपूर्ण असलेल्या puneprimenews या साप्ताहिक पोर्टलला आम्ही वर्षभरापूर्वी सुरुवात केली होती. स्थानिक पातळीवरील कळीचे मुद्दे हे या पोर्टलचे वैशिष्ट्य आहेच; पण त्याचबरोबर नेहमी ताज्या बातम्या आणि आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींचे वस्तुनिष्ठ विश्लेषण हेही आमचे एक वैशिष्ट्य राहिले आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींच्या अद्ययावत बातम्या देणे हा नेहमीच आमचा प्राधान्यक्रम राहिला आहे. त्याचबरोबर समाजकारण, राजकारण, अर्थकारण, कृषी, गुन्हे, शैक्षणिक, आरोग्य, करिअर मार्गदर्शन अशा सर्व क्षेत्रांतल्या बातम्या, लेखांमधून वाचकांच्या पसंतीस उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही केला आहे. जिल्हा, राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडींची माहिती तातडीने व विश्वासार्हता पडताळूनच देण्याचा आमचा मानस होता आणि पुढील काळात ही असणार आहे.

गेल्या एक वर्षात तो यशस्वीही झाला. वाचकांच्या मतांचा आदर ठेवून हे पोर्टल त्यांच्या अपेक्षेनुसार चालले आहे. वाचकांना वाचायला काय आवडेल आणि त्यांनी काय वाचलं पाहिजे याचा नेहमीच विचार केला. याची पोचपावती म्हणजे वर्षभरात आमच्या या पोर्टलला लाखो वाचकांचा उत्तम, उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला. संवेदनशीलता, विश्वासार्हता टिकवून ठेवत पोर्टलमधील प्रत्येक मजकुरावर लक्ष केंद्रित केल्याने हे पोर्टल वाचकांच्या जिव्हाळ्याचे झाले आहे.

 

वाचकांच्या प्रतिसादाचा सकारात्मकतेने विचार करून संपादक या नात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व वाचकांना सांगताना आनंद होतोय की, आपल्या ”पुणे प्राईम न्यूज” या साप्ताहिकाचे २२ जुलैपासून दैनिकात रुपांतर होत आहे. आपण केलेल्या सहकार्याची ही पोचपावती आहे. या यशात वाचकांचा सिंहाचा वाटा आहे, हे विसरता येणार नाही.

वाचकांच्या प्रतिसादामुळे आमचा उत्साह केवळ दुणावलाच नाही, तर कैक पटींनी वाढला आहे. यापुढे महाराष्ट्रातील ध्येयवादी, निर्भीड पत्रकारितेची गौरवशाली परंपरा कायम जपत, या दैनिकाच्या माध्यमातून ताज्या घडामोडी प्रत्येक सेकंदाला आणि खात्रीशीर तपशीलांसह वाचकांपर्यंत पोचविण्याची आमची जबाबदारी अधिकच वाढली आहे. या जबाबदारीचे पालन आम्ही अविरतपणे करत राहू, हा विश्वास या निमित्ताने तुम्हा सर्व वाचकांना, हितचिंतकांना देत आहोत.

पुढील काळात ”पुणे प्राईम न्यूज” दैनिकातून जनजीवनाचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला नक्कीच दिसेल. ‘जागल्या’ची भूमिका आम्ही कायमच प्रभावीपणे निभावू. शक्य तितक्या कार्यक्षमतेने ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवताना आमचा तोच उत्साह असेल याची शंभर टक्के खात्री देत आहोत. तुमचाही तोच प्रतिसाद आम्हाला कायम लाभेल, एवढीच माफक अपेक्षा आहे. वाचकांशी जुळलेले ऋणानुबंध शेवटपर्यंत जपण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू.

ताज्या, तत्पर बातम्या अन् दर्जेदार लेख, हीच आहे ‘पुणे प्राईम’च्या यशाची मेख!

मनापासून धन्यवाद…

जनार्दन दांडगे
मुख्य संपादक.

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

Big News : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना आरोग्यदूत पुरस्कार जाहीर ; आज होणार पुरस्कार वितरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp