पुणे: पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसाला सध्या अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. महसुल, पोलिस, वाहतूक, महावितरण, पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, सेतू, शिक्षण अशा अनेक समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. मात्र या समस्यांची दखल ना स्थानिक लोक प्रतिनिधींकडून, ना प्रशासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. क्षुल्लक कामासाठी अनेकवेळा खेटे मारावे लागतात. अशावेळी सामान्य नागरिकांसाठी कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो.
सर्व सामान्य माणसांच्या प्रश्नांची दखल लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडून घेतली जात नसली, तरी येथून पुढे तुमच्या प्रत्येक समस्येची दखल आपले लोकप्रिय वर्तमानपत्र “पुणे प्राईम न्यूज” कडून घेतली जाणार आहे. नवरात्रीचा पवित्र दिवस लक्षात घेऊन, “पुणे प्राईम न्यूज” उद्या (रविवार) पासुन ”पंचनामा” नावाचं नवीन सदर सुरु करत आहे. यामध्ये तुम्हाला भेडसावणाऱ्या महसुल, पोलिस, वाहतूक, पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, सेतू, शिक्षणसह प्रत्येक समस्येला वाचा फोडण्याचे काम केले जाणार आहे. कृषी. महावितरण, पाणी पुरवठा, सार्वजिनक आरोग्य, सार्वजिनक वाहतूक, महसूल संबंधित कामात येणाऱ्या अडचणींसह प्रत्येक अडचणींबाबत आवाज उठवण्याचे काम ”पुणे प्राईम न्यूज”कडून केले जाणार आहे.
सामान्य नागरिकही होऊ शकतात सहभागी..
“पुणे प्राईम न्यूज”च्या ”पंचनामा” सदरामध्ये सामान्य नागरिकही आपला सहभाग नोंदवू शकतात. आपल्या भागात असणाऱ्या समस्या तुम्ही आम्हाला ”पुणे प्राईम न्यूज’‘च्या मेलवर कळवू शकता. त्यानंतर ”पुणे प्राईम न्यूज”कडून नागरिकांनी पाठवलेल्या समस्येची खातरजमा आणि पडताळणी केली जाईल.
दरम्यान, योग्य त्या यंत्रणेला जाब विचारत त्याला प्रसिद्धी देण्यात येईल. समस्यांची बातमी देताना आपल्याला काही अडचण वाटल्यास, आपले नावही गोपनीय ठेवण्यात येईल. आपण नेहमीप्रमाणे आमच्या या उपक्रमाला भरभरून पाठिंबा द्याल, अशी अपेक्षा आहे.