पुणे : आज 8 मार्च जागतिक महिला दिन… या जागतिक महिला दिनानिमित्ताने पुणे शहर पोलीस उपायुक्तालयातील महिला पोलिसांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने परिमंडळ 5 मधील महिला पोलिसांच्या वतीने आज 8 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले सांस्कृतिक भवन. वानवडी ते एम. एस.जोशी कॉलेज हडपसर असे महिला पोलीस बाईक रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीतून पोलिसांकडून “बेटी बचाओ,बेटी पढाओ “चा नारा देण्यात येणार आहे.
दरम्या या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 चे डॉ. राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ पाच मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या वतीने करण्यात येणार आहे. या बाईक रॅलीस सिने अभिनेता पुष्कर जोग व प्राजक्ता गायकवाड यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सकाळी साडेदहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान महिला दिनाचे औचित्य साधून काल शहरासह उपनगरात असलेल्या दस्त नोंदणी कार्यालयाचे कामकाज महिलांच्या हाती देण्यात आले. दस्त नोंदणीचे कामकाज शासन आणि नागरिक यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. असे जबाबदारीचे काम महिलांच्या हाती देण्यात येऊन समर्थपणे त्या पेलू शकतात हे दिसून आले.