पुणे: पोलिस भरती प्रक्रियेत होणाऱ्या कॉपी, डमी उमेदवार, तसेच शारीरिक चाचण्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या भरती प्रक्रियेत प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. पोलिस शिपाई, वाहनचालक आणि कारागृह शिपाई पदांची भरती आता एआयच्या कडक देखरेखीखाली होणार असल्याने प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे.

भरतीसाठी उमेदवार मैदानात (Pune Police Bharti) प्रवेश करताच त्याचा चेहरा आधी नोंदवलेल्या (Police Bharti) माहितीसोबत त्वरित जुळवला जाणार आहे. चेहरा ओळखणाऱ्या (Police Bharti Pune) प्रणालीमुळे डमी उमेदवार उभा करण्याचा कोणताही प्रयत्न झाला, तर लगेच इशारा मिळणार आहे. यामुळे दुसऱ्या व्यक्तीला परीक्षेत उभे करण्याचे प्रकार थांबवता येणार आहेत. (Marathi News)
शारीरिक चाचणीदरम्यान छातीची मोजणी झाल्यानंतर उमेदवार मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा परत आला, तरी तोच उमेदवार आहे की नाही, याची खात्री एआय प्रणाली करणार आहे. त्यामुळे मध्येच उमेदवार बदलण्याचा कोणताही प्रकार होणार नाही. याआधी अशा स्वरूपाच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या होत्या. (Pune News)
धाव चाचणीदरम्यान वेळेची हेराफेरी टाळण्यासाठी धावपट्टीवर विशेष सेन्सर बसवले जाणार आहेत. उमेदवाराने धाव पूर्ण करण्यासाठी घेतलेला अचूक वेळ थेट संगणक प्रणालीत नोंदवला जाणार आहे. त्यामुळे मानवी चूक किंवा मुद्दाम केलेली गडबड टाळता येणार असून सर्व उमेदवारांना समान संधी मिळणार आहे.
यंदाच्या भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. पोलिस शिपाईच्या 1833 पदांसाठी 86240 अर्ज आले आहेत. वाहनचालकाच्या 103 पदांसाठी 42896 अर्ज, तर कारागृह शिपाईच्या 130 पदांसाठी 20791 अर्ज प्राप्त झाले आहेत. एआय तंत्रज्ञानामुळे फसवणूक करणाऱ्यांना आळा बसेल आणि प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळेल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.






