Pune News: पुणे पोलिसांनी मागच्या आठवड्यात मध्य प्रदेशातील उमरती गावातून अवैद्य देशी बनावटी पिस्तुलच्या कारखान्यांवर छापा टाकला. या कारवाईतून पोलिसांनी तब्बल 50 भट्टा उद्ध्वस्त केला. तसेच 36 जणांना अटक करण्यात आले. या धडक कारवाईमुळे पुणे पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. Pune News

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या धडकेबाज कामगिरीमुळे या कारवाईत असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये बक्षीस रुपये जाहिर करण्यात आले. ही धडाकेबाज मोहिम कशी राबवण्यात आली या मोहिमेसाठी कुणाकुणाची मदत करण्यात आली याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अशी केली धडाकेबाज कामगिरी
या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त यांनी महत्त्वाची माहिती दिली. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्र देखील याच उमरती गावातून मागवले होते. पोलीस पथकांनी 50 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबले होते. गुन्हेगाऱ्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले. या कारवाईची माहिती बाहेर न जाता रहावी म्हणून पोलिसांनी सरकारी वाहनांऐवजी खासगी गाड्यांचा वापर करून संपूर्ण मोहीम गुप्त ठेवली होती.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रात्री सुमारे 11 वाजता पथके संबंधित गावात पोहोचली आणि तत्काळ तपासणीला सुरुवात झाली. पहाटे 4 वाजेपर्यंत संपूर्ण परिसराला वेढा घालून मोठ्या प्रमाणात छापे टाकण्यात आले. या संयुक्त कारवाईत मध्य प्रदेश व जळगाव पोलिसांचेही सहकार्य मिळाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.






