Pune News : पुणे : वन्यजीव विभागाच्या पथकाने कोंढवा येथील ब्लिस नर्सरीत सोमवारी (ता.९) धाड टाकून कासव व पोपटाची तस्करी होत असल्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत पथकाने एकाला अटक केली आहे. तर तीन जीवंत कासव व दोन पोपटांची सुटका केली आहे.
न्यायालयाकडून दोन दिवसांची वन कोठडी
विशाल सुखलाल यादव (वय 36 रा. गल्ली नं 04,अंबिका नगर, बिबवेवाडी मार्केटयार्ड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune News) आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवस वन कोठडी सुनावली आहे.
पुणे येथील मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील ब्लिस नर्सरीत विनापरवाना वन्यजीव व पक्षी ठेवले आहे, अशी माहिती वन्यजीव विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी धाड टाकली. (Pune News) तेव्हा पथकाला अवैधरित्या ठेवलेले तीन जिवंत कासव व दोन पोपट आढळून आले. त्यानंतर पथकाने तात्काळ वन्यप्राणी पक्षी ताब्यात घेतले.
ही कामगिरी मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उप वनसंरक्षक महादेव मोहिते, वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी एच. ए.जाधव, वन परिमंडळ अधिकारी मंगेश सपकाळे, सीमा मगर, राजकुमार जाधव, अनिल राठोड, संभाजी गायकवाड, संजीव कांबळे, मधुकर गोडगे, वनरक्षक प्रिती नागले व मनोहर पायगुडे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कोलकात्याहून पुण्यात आलेल्या प्राध्यापकाचा हॉटेलच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू
Pune News : जागतिक टपाल दिनी पोष्ट कर्मचाऱ्यांचा हृद्य सत्कार