Pune News : पुणे : अग्निवीर म्हणून लष्करात भरती करुन देतो, असे सांगून एका भामट्याने १६ तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीला आला आहे. लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांनी या भामट्याला कोईमतूर येथून अटक केली आहे.
भामट्याला कोईमतूर येथून अटक
याबाबत सांगली जिल्ह्यातील तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रणजितकुमार राजेंद्र सिंग (रा. कोईमतूर) या भामट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुण्यात वेटर काम करतात. लष्करात भरती व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. (Pune News) या इच्छेखातर फिर्यादी व त्याचे मित्र रेसकोर्स येथे भरतीचा सराव करत होते. त्यावेळी त्यांना आरोपी रणजीतकुमार भेटला.
फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने त्यांच्या फिटनेसची प्रशंसा केली. त्याच्या गोड बोलण्यावर फिर्यादी भाळले. ते पाहून आपण आर्मी इंटेलिजन्समधून असून, एएफएूसी येथे ऑन ड्युटी असल्याचे त्याने सांगितले. तुम्हाला देखील मी आर्मीमधील एओसीमध्ये सिंकदराबाद येथे भरती करतो, असे त्याने सांगितले. (Pune News) त्यासाठी साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले.
या भामट्याने फिर्यादी व त्याच्या मित्राला बनावट अपॉईन्टमेंट लेटर दिले. तसेच चौघांकडून १२ लाख ८० हजार रुपये घेतले. त्यांना सिंकदराबाद येथे बोलावून घेतले. (Pune News) प्रत्यक्षात तो भेटलाच नाही. तेव्हा फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी पुणे येथील मिलीटरी इंटेलिजन्स युनिटमधील अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला.
वानवडी पोलीस व मिलिटरी इंटेलिजन्स यांनी कोईम्बतूर येथून रणजितकुमार याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर धाराशिव, लातूर, सातारा, कोल्हापूर, पुण्यातील आणखी १२ जणांना आर्मीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. (Pune News) पोलीस उपनिरीक्षक शितोळे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका पाहता येणार
Pune News : बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्यास मांजरी खुर्द येथून अटक