Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : जिवाची बाजी लावून केला विद्युत पुरवठा सुरळीत; लोणी काळभोरच्या वीज कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 27 September 2023, 14:21

Loni Kalbhor  : लोणी काळभोर : वीज गेली की, अनेकजण महावितरणच्या नावाने खडे फोडायला सुरवात करतात. याच महावितरणचे कर्मचारी वेळ आली की भर पावसात, जिवाची बाजी लावत रात्री-अपरात्रीही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत असतात. याची कल्पना टीकाकारांना नसते. याचा प्रत्यय लोणी काळभोरकरांना नुकताच आला. वीज गेल्यावर पाहणी केल्यानंतर शिवशक्ती व कदमवाकवस्ती येथील इस्ट हेवन येथील वीजवाहिनीत बिघाड झाल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शोधून काढले. मुसळधार पावसात मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तब्बल १३ मीटर उंचीच्या विद्युत खांबावर चढून विद्युतपुरवठा सुरळीत केला. या कामगिरीमुळे लोणी काळभोर येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मध्यरात्री विद्युत खांबावर चढून पुरवठा केला सुरळीत

लोणी काळभोर येथे मंगळवारी सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरवात झाली. पावसामुळे वीजेचा लपंडाव सुरू होता. मात्र, मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोरचा विद्युत पुरवठा अचानक बंद झाला. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्या विद्युतवाहिनीत बिघाड झाला, याचा शोध घेण्यास सुरवात केली. (Loni Kalbhor ) कर्मचाऱ्यांनी सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वीजवाहिनीत बिघाड झाल्याचे शोधून काढले.

लोणी काळभोर येथील शिवशक्ती व कदमवाकवस्ती येथील इस्ट हेवन या ठिकाणी असलेल्या वीजवाहिनीत बिघाड झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मुसळधार पावसाचीही तमा न बाळगता मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तब्बल १३ मीटर उंचीच्या विद्युत खांबावर चढून, विद्युत पुरवठा सुरळीत केला. यामुळे ऐन गणेशोत्सवात अंधारात असलेले गाव पुन्हा वीजेच्या झगमगाटाने उजळले. (Loni Kalbhor ) या उत्तम कामगिरीमुळे लोणी काळभोर येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोणी काळभोर येथील शिवशक्ती व कदमवाकवस्ती येथील इस्ट हेवन या तब्बल १३ मीटर उंचीचे विद्युत खांब आहेत. वीजपुरवठा सुरू करून ग्राहकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी विद्युत तंत्रज्ञ पांडुरंग खरात, दादा चौधरी, अक्षय पाटील व विशाल मोरे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास विद्युत पोलावर चढले. तरीही पावसाचा जोर कमी झाला नव्हता. या पावसात विद्युत कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता, चीनी मातीच्या पीन बदलून लोणी काळभोर गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत केला. (Loni Kalbhor ) यासाठी लोणी काळभोर शाखेचे कनिष्ठ अभियंता रामप्रसाद नरवडे, वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल शेलार, श्रीकृष्ण लाड, दादा आगळे यांचे सहकार्य मिळाले.

 

जीव धोक्यात घालून काम

महावितरणचे कर्मचारी म्हणजे हातात टेस्टर, पकड, वायर असे चित्र सहसा पाहायला मिळते. वीज गेली की, त्यांच्या नावाने सगळेच बोटे मोडतात. (Loni Kalbhor ) परंतु लोणी काळभोर येथील महावितरण कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कारण त्यांनी मुसळधार पाऊस व रात्रीच्या अंधारात जीव धोक्यात घालून वीज पुरवठा सुरळीत केला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूलमध्ये ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम उत्साहात

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूलमध्ये ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम उत्साहात

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद, पण कारवाई मात्र नाहीच !

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05
Next Post

Bhigwan News : जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार हिराजी काळे यांना प्रदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp