Pune News : पुणे : पुणे मेट्रोची विस्तारित मार्गावरील सेवा सुरू झाल्यानंतर पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद नोंदवला. पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय या मार्गाच्या दुप्पट प्रवासी संख्या वनाझ ते रुबी हॉल या मार्गावर पहिल्या दोन दिवसांतच दिसून आली. शहरातील प्रतिसाद पाहता आता वाघोली-शिरूर आणि नाशिक फाटा-खेड (राजगुरुनगर) या उन्नत मार्गांवर अत्याधुनिक ‘लाइट मेट्रो’ नियोजित असून, त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने यासाठी मंजुरी दिली आहे.
वाघोली-शिरूर आणि नाशिक फाटा- राजगुरुनगर आराखड्याचे काम सुरू
जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा तसेच प्रदूषणाला आळा बसावा, यासाठी मोठ्या शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार सुरू आहे. (Pune News) आता शहराच्या आसपासच्या औद्योगिक वसातहीदेखील मेट्रोने जोडण्याची योजना प्रस्तावित आहे. यासाठी वाघोली-शिरूर आणि नाशिक फाटा-खेड (राजगुरुनगर) या उन्नत मार्गांवर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येत आहे.
दरम्यान, नाशिक फाटा ते खेड या मार्गावरील मेट्रो मोशी, चाकण, तळेगाव औद्योगिक वसाहत आणि खेड एसईझेडला उपयुक्त ठरू शकते. (Pune News) वाघोली-शिरूर मार्गावरील मेट्रो शिक्रापूर, रांजणगाव आणि सणसवाडी येथील औद्योगिक वसाहतींसाठी उपयुक्त ठरू शकते. या दोन्ही मार्गांवरील प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येत असून, लवकरच त्याचे स्वरूप निश्चित होईल, अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वाघोली, शिक्रापूर आणि रांजणगाव एमआयडीसी येथे तसेच नाशिक फाटा ते खेड या ३० किलोमीटरदरम्यान वाढलेले नागरिकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असते. उत्पादनावर याचा थेट परिणाम होत असल्याचे काही सर्व्हेंमधून समोर आले आहे. उन्नत मार्ग आणि मेट्रोमुळे या औद्योगिक वसाहतींना मोठा फायदा होणार आहे. (Pune News) ऑटोमोबाइल हब अशी पुण्याची ओळख असून, त्यातील सर्वाधिक कंपन्या चाकण औद्योगिक वसाहतीत कार्यरत आहेत; तसेच खेड एसईझेडमध्येही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. हे महत्त्व ओळखून नाशिक फाटा ते खेड या प्रस्तावित उन्नत मार्गावर अत्याधुनिक लाइट मेट्रोचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे-नगर महामार्गावरील रांजणगाव आणि सणसवाडी (ता. शिरूर) येथील औद्योगिक वसाहतीत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. मात्र, येथे वाहतूक कोंडी ही भीषण समस्या आहे. यामुळेच वाघोली ते शिरूर या प्रस्तावित मार्गावर मेट्रोचे नियोजन केले आहे. शिरूर तालुक्यातील सणसवाडी औद्योगिक वसाहतीलादेखील याचा लाभ होऊ शकतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आम्ही घरातून काम करण्याची संधी देतो… म्हणत शिकवणी चालक महिलेची पाच लाखांची फसवणूक!
Pune News : संतापजनक! जन्मदात्या आईच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी; मुलावर गुन्हा दाखल!
Pune News : पुण्यातील पद्मावती बस स्थानकाजवळ बर्निंग कारचा थरार