Pune News : पुणे : केंद्र सरकारकडून देशाचे नाव बदलून ‘भारत’ करण्याचे संकेत अनेकदा देण्यात येत आहेत. यावरूनच देशातील राजकारण तापले आहे. देशाचे अधिकृत इंग्रजी नाव बदलून इंडिया India ऐवजी भारत Bharat असे केलेले नाही. मात्र, गुगल मॅपने भारताचे (India) नवे नाव भारत (Bharat) असे स्वीकारल्याचे दिसत आहे. यामागचे कारण म्हणजे जर तुम्ही गुगल मॅपच्या सर्च बॉक्समध्ये भारत टाइप केले तर, तुम्हाला तिरंगा ध्वज दिसेल, ज्यावर दक्षिण आशियातील एक देश असे लिहिलेले दिसेल.
गुगल मॅपने भारत आणि इंडिया या दोन्ही शब्दांना दिली मान्यता
तुम्ही गुगल मॅपवर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कोणत्याही भाषेत भारत लिहिल्याने काही फरक पडत नाही. तुम्ही ‘भारत’ शब्द हिंदी किंवा इंग्रजीमध्ये गुगल केल्यास, तुम्हाला परिणाम म्हणून भारत दाखवेल. (Pune News) गुगल मॅपने भारत आणि इंडिया या दोन्ही शब्दांना ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे, जर वापरकर्त्यांना भारताचा अधिकृत नकाशा गुगल मॅपवर पाहायचा असेल तर ते इंग्रजी किंवा हिंदीमध्ये गुगल मॅपवर भारत लिहून करू शकतात.
दरम्यान, केंद्र सरकार देशाचे नाव बदलण्याच्या तयारीत व्यस्त असताना, गुगलने आधीच आपले काम सुरू केले आहे. गुगल मॅपमध्ये हिंदी भाषेत तुम्ही ‘भारत’ टाइप केल्यास तुम्हाला भारताच्या नकाशासोबत ठळक अक्षरात ‘भारत’ लिहिलेले दिसेल. (Pune News) त्याचबरोबर गुगल मॅपमध्ये इंग्रजीत भारत लिहिल्यास सर्च रिझल्टमध्ये देशाच्या नकाशासोबत ‘भारत’ लिहिलेले दिसेल. म्हणजे गुगल मॅपही भारताला ‘इंडिया’ आणि ‘भारत’ अशा दोन्ही नावांनी स्वीकारत आहे.
टेक कंपनीच्या इतर प्लॅटफॉर्मवरही जर भारत आणि इंडिया लिहिलं तरी त्याचे सर्च रिझल्ट अगदी सारखेच दिसत आहेत. (Pune News) जर युजर्स गुगल सर्च, गुगल ट्रान्सलेटर, गुगल न्यूज सारख्या अॅप्सवर जाऊन भारत किंवा इंडिया लिहिल्यावर तुम्हाल एकसारखीच उत्तरे दिसत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे नगर महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; चौघे जखमी